महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार वेळोवेळी लोकहिताच्या विविध योजना सुरू केल्या जात असून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे ध्येय आहे. यासाठीही सरकारने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. याचा फायदा राज्यातील नागरिकांना होऊन राज्यही आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्याचा उद्देश आहे.

शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी फार्मर्स (MahaDBT Farmers) यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर्स कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अनुदानासाठी अर्ज केलेल्या व अर्ज करू इच्छिणाऱ्या आणि अर्ज करून अनुदानासाठी पात्र झालेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरण राज्य पुरस्कृत या योजनांसाठी तरतूद केलेला 100% निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्र / ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देणारी महत्त्वाची योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान जी केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून चालवली जाते.

ही योजना राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2018 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी 2021 -22 साठी 310.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

तुम्हाला माहीतच असेल गेल्या आठ ते दहा दिवसांपासून प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत लक्ष्य उपलब्ध करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत या योजनांचे लाभ द्यावेत अशा प्रकारचे आव्हान करण्यात आलं आहे.

या योजने अंतर्गत नव्याने अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा लॉटरी काढण्यात येणार आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर लवकरात – लवकर अर्ज करू शकता…

तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अर्ज केला नसेल आज या लेखात आपण किसान ट्रॅक्टर योजना योजनेबद्दल संबंधित सर्व माहिती जाणून घेणार आहोत जसे की, या योजनेची पात्रता, कागदपत्रे, योजनेचा उद्देश, लाभ, वैशिष्ट्ये, अर्ज प्रक्रिया इ. त्यामुळे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हा पूर्ण लेख वाचा…

महा DBT ट्रॅक्टर योजना 2022 :- लाभ  

राज्यातील शेतकरी mahadbt farmer scheme अनुदान 2022 योजनेअंतर्गत अनुदानावर ट्रॅक्टरसाठी अर्ज करू शकतात. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. ही योजना देखील त्याच मोहिमेचा एक भाग असून, या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या श्रेणीनुसार नवीन ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना तब्बल 65 टक्के अनुदान दिलं जातं. अन् यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात अन् तेही निम्म्या किमतीत…

ट्रॅक्टर योजनेंतर्गत नवीन ट्रॅक्टर खरेदी करताना 65% अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात दिलं जातं.

योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात 1 ते 1.25 लाखांचा लाभ दिला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यासोबतच या बँक खात्यात आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत जनरल प्रवर्गासाठी 1 लाख रुपये अनुदान दिलं जातं तर, SC/ ST प्रवर्गासाठी 1 लाख 25 हजारांचे अनुदान दिलं जातं.

अर्ज मंजूर झाल्यानंतर ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या रकमेपैकी केवळ 35% रक्कम गुंतवावी लागेल.

योजनेचा लाभ शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर असावा. जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्यास ट्रॅक्टर अनुदान मिळविण्यासाठी शेतकरी त्याच्या नावावर अर्ज करू शकत नाही.

ट्रॅक्टर योजनेंतर्गत, राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना 65% पर्यंत अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टर कर्जाच्या 65% कर्ज फक्त शेतकऱ्यांनाच मिळू शकते.

mahadbt farmer scheme ट्रॅक्टर योजनेंतर्गत देशातील जास्तीत जास्त महिला शेतकऱ्यांना अधिक लाभ दिला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही 20BHP ते 35BHP ट्रॅक्टर खरेदी करू शकता…

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे :-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर 1 एकर तरी शेतजमीन असावी.
अर्जाच्या पहिल्या 7 वर्षांसाठी, अर्जदार कोणत्याही सरकारी योजना, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभार्थी नसावा.
जमिनीची कागदपत्रे :- 7/12 व 8A
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट साइज फोटो
ओळख पुरावा (आधार कार्ड)
ट्रॅक्टरचे RC बुक
अर्ज भरताना सर्व्हे नंबर / गट नंबर माहिती असायला हवा.

लॉटरी लागल्यानंतर ही कागदपत्रे अपलोड करावे :-

ट्रॅक्टरचे कोटेशन
टेस्ट रिपोर्ट
डिलिव्हरी चालान
बँक खाते पासबुक
आधार कार्ड

कसा कराल ऑनलाईन अर्ज :-

महा डीबीटी (Maha DBT) शेतकरी योजना रजिस्ट्रेशन :

1) नोंदणी करण्यासाठी, प्रथम अधिकृत पोर्टल वर जा किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

2) होमपेजवर पोहोचल्यानंतर, नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करा.

3) पुढील पोस्टवर तुमचा नंबर टाका आणि स्वतःसाठी युजर्स नेम आणि पासवर्ड तयार करा, पासवर्ड 8 ते 20 Character चा असावा हे लक्षात ठेवा, पासवर्डमध्ये संख्या, शब्द आणि विशेष Character वापरा.

4) आता तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून ओटीपी पडताळणी (OTP verification) किंवा पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतर दिलेल्या नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करा, अशा प्रकारे तुम्ही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकता….

5) आता झालं तुमचं महा डीबीटी (Maha DBT) पोर्टल वर रजिस्टेशन.. ( टीप : राज्यातल्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी महा डीबीटी (Maha DBT) पोर्टल वर रजिस्ट्रेशन करणं अति आवश्यक आहे)

आता आपण महा डीबीटी (Maha DBT) पोर्टलवर पीक फवारणी यंत्राबाबत अर्ज कसा कराल ? ते पाहूया… (टीप : तुम्हाला ज्या यंत्रासाठी अजर करायचा आहे त्यांनी यंत्रात बदल करावा)

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

1) सर्व प्रथम ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजेच महाडीबीटी पोर्टल वर वर आपला युजर आयडी आणि पासवर्ड किंवा आपला आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करावे.

2) होम पेज वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये अर्ज करा यावर क्लिक करा.

3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 7 बाबी पर्यंत बाबी निवडायच्या आहेत ‘कृषीयांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक करा.

4) यानंतर आपल्या प्रोफाईलची स्थिती दाखवली जाईल. यात वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, गाव, तालुका, मुख्य घटकमध्ये ‘कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य’

5) तपशील मध्ये ‘ट्रॅक्टर’ निवडा, एच पी श्रेणी मध्ये 20HP ते 35HP पर्यंत निवडा यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकारामध्ये 2 डब्ल्यू डी / 4 डब्ल्यू डी कोणतीही 1 बाब निवडा. त्यानंतर ‘जतन करा’ वर क्लिक करा. तुमची बाब SUCCESS होईल.

6) तुम्हाला ट्रॅक्टर ची बाब तुमच्या प्रोफाइल मध्ये ऍड झालेली दिसेल.

7) यानंतर पुन्हा तुम्हाला मुख्य पृष्ठ वर जावं लागेल, अन पुन्हा ‘अर्ज करा’ वर क्लिक करावं लागेल. यानंतर ‘अर्ज सादर करा’ वरती क्लिक करा. यानंतर एक सूचना दाखवली जाईल ती वाचून OK करा.

8) OK केल्यानंतर तुम्हाला ‘पहा’ हा ऑप्शन दिसेल. पहा वर क्लिक केल्यानंतर तुम्ही जी बाब निवडली आहे ती दिसेल. त्याला प्राधान्य क्रम देऊन पुन्हा अर्ज सादर करा वरती क्लिक करा.

10) क्लिक केल्या नंतर पुढे आपणाला दुसऱ्या पेज वर redirect केले जाईल या पेज वर आपणाला make payment चे ऑपशन दाखवला जाईल. इथे आपण 23.60 रुपयांचं payment करू शकता.

payment करण्यासाठी आपणाला बरेच ऑपशन दाखवले जातील UPI , Wallet , net banking , IMPS यापैकी आपल्याला ज्या प्रकारे payment करायची आहे ते ऑपशन निवडून तुम्ही payment करू शकता…

अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल, सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला मॅसेज येईल म्हणजेच लॉटरी लागेल. त्यानंतर तुम्ही सर्व कागदपत्रे जसे की, ट्रॅक्टर कोटेशन / 7/12 आणि 8-अ / टेस्ट रिपोर्ट ( हा रिपोर्ट ट्रॅक्टर खरेदी शोरूम मधून मिळेल) / जातीचा दाखला / बँक पासबुक फ्रंट पेज / अपलोड करावं लागेल. यानंतर तुम्हाला या अनुदानाचा लाभ मिळेल व ते अनुदान डायरेक्ट तुमच्या खात्यात जमा होईल…

हा अर्ज तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्रातही करू शकता…

धन्यवाद….

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *