सध्या देशभरात कांद्याचे भाव गगनाला का भिडत चालले आहे ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आतापर्यंत कांद्याचा दर ठीकठाक चालला होता. पण अचानक काय झाले की, कांदा लाल झाला. तर जाणून घ्या की यामागे कोणतेही तात्कालिक कारण नसून काही कारणे पडद्यामागून सुरु आहे.

होय, त्या कारणांचा परिणाम आता दिसू लागला आहे, ही वेगळी बाब आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकले तर लक्षात येईल की, अलीकडची महागाई ही आजची देणगी नसून, त्याचे परिणाम आधीच दिसत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी या पारंपारिक शेतीपासून दूर जात आहेत आणि दुसरे पीक घेत आहेत. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट होऊन भाव झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. (Onion Price Today)

तसं पाहिलं तर, महाराष्ट्र हे देशातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य आहे, परंतु कांद्याचा व्यवसाय, बाजारपेठ आदींची अचूक माहिती नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळत आहेत. नाशिकचे शेतकरी राजू शिंदे सांगतात की, काही महिन्यांत टोमॅटोने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न दिले आहे, त्यामुळे त्यांनी कांद्याची लागवड सोडून टोमॅटो पिकवण्यास सुरुवात केली आहे. शिंदे सांगतात की, त्यांच्यासारखे अनेक शेतकरी कांद्यापासून दूर जात आहेत. कारण त्यांना कांद्याची बाजारपेठ, त्याची किंमत आणि व्यवसाय याबाबत कोणतीही अचूक माहिती मिळू शकत नाही. अशा स्थितीत आपण काय पेरतोय आणि कापणी करतोय आणि त्याला दर काय मिळणार ? याची माहितीच नसताना शेती करून उपयोग काय, असे शिंदेंसारख्या शेतकऱ्यांना वाटते.

कांदा लाल का झाला ?

दुसरीकडे, महाराष्ट्रातून कांद्याला किती मागणी आहे हे जाणून घेण्यासाठी हा आकडा पाहा. महाराष्ट्राचा कांदा भोपाळ, जयपूर, लखनौ आणि दिल्लीच्या बाजारात जातो. तेथून कांदा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, पंजाब आणि हरियाणा येथे पाठवला जातो. म्हणजेच महाराष्ट्राच्या कांद्याचा पुरवठा जवळपास देशभर केला जातो, पण तेथील शेतकरी या सर्व गोष्टींबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. या वेळी खरीप कांद्याची आवक होण्यास उशीर होणार अशी स्थिती असून रब्बी हंगामातील कांदे आधीच खराब झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

शेतकऱ्यांचं काय आहे म्हणणं ?

नाशिकचे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते शैलेश पाटील सांगतात की, दरवर्षी शेतकरी कांद्याची सर्वत्र माहिती घेतात आणि त्याच आधारावर शेती करतात. इकडून – तिकडून मिळालेली माहिती घेऊनच ते कांद्याचे क्षेत्रफळ ठरवतात. काही शेतकऱ्यांनी स्वत:चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला असून त्यामध्ये माहिती दिली जाते आणि शेतकरी शेती करतात, तर सरकारी पातळीवर त्यांना अशी कोणतीही अचूक माहिती मिळत नाही..

कांदा खरेदीसाठी मोजा जास्तीचे पैसे..

या सर्व समस्या पाहून महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड सोडून दिली आहे. अलिकडच्या वर्षांत कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांची निराशा केल्यामुळेही हे घडले. गेल्या तीन हंगामात कांद्याने शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. त्याचा परिणाम आता कांद्याच्या भावावर दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर आणखी वाढणार असून सर्वसामान्यांना खिसा मोकळा करावा लागणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागणीही झपाट्याने वाढेल, पण पुरवठ्याअभावी लोकांना कमी दर्जाच्या कांद्याने काम करावे लागेल, तेही जादा दर देऊन..

टोमॅटोच्या शेतकऱ्यांनी अलिकडच्या काही महिन्यांत, विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये चांगले उत्पन्न मिळवले आहे. हे पाहून कांदा उत्पादक शेतकरी आता टोमॅटोच्या लागवडीत व्यस्त झाले आहेत. त्यामुळे कांद्याचे क्षेत्र घटत असून पुरवठा कमी होत असताना मागणी वाढली आहे किंवा पूर्वीइतकीच आहे. अशा स्थितीत कांद्याच्या दरात वाढ होणे साहजिकच आहे. तीच परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

कांदा साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा..

दुसरीकडे सरकार आता नाफेडने साठवलेला कांदा बाजारात आणणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत होती. दरम्यान, नाफेडने एक पत्रक काढून 15 सप्टेंबरनंतर कांदा बाजारात विकण्याबाबत निर्णय होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आगामी महिनाभरात कांद्याला चांगला दे मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *