शेतीशिवार टीम, 17 जून 2022 : Maharashtra SSC Result 2022 Live Updates : महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल mahresult.nic.in आणि sscresult.mkcl.org या बसाइट वर पाहू शकतील.
महाराष्ट्र बोर्डाची SSC परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल २2022 या कालावधीत घेण्यात आली. महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी परीक्षेत एकूण 16,38,964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 889506 मुले आणि 749458 मुलींचा समावेश होता.
परीक्षेसाठी मुंबई विभागातून एकूण 373840 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. मुलांना एका सूत्राच्या आधारे पास करण्यात आलं होतं. यापूर्वी महाराष्ट्राचा 12वीचा निकाल 2022 जाहीर झाला आहे. बारावीत 94.22% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे राज्य मंडळ कार्यालया कडून सांगण्यात आलं आहे की, निकाल ऑनलाइन जाहीर केले जातील आणि मार्कशीटच्या हार्डकॉपी वेगवेगळ्या शाळांद्वारे लगेच वितरीत केल्या जाणार आहे.
मार्कशीट कधी आणि कुठे मिळेल ?
विद्यार्थ्यांची ऑनलाइन मार्कशीट दुपारी 1 वाजता उपलब्ध होईल. एकदा SSC महाराष्ट्र निकाल : 2022 जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या मूळ गुणपत्रिका त्यांच्या संबंधित शाळांमधून मिळवू शकतात.