Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : अहमदनगर, पुणे जिल्ह्यासह 34 ZP अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; पहा, तुमच्या ‘झेडपी’त कोणतं आहे आरक्षण ?

शेतीशिवार टीम : 1 ऑक्टोबर 2022 :- राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 34 जिल्ह्यांतील 7649 ग्रामपंचायतीच्या निडवणूक लांबणीवर टाकल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांबाबत ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

ग्रामविकास विभागाने एक राजपत्रक काढून 34 जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलं आहे. परंतु एकीकडं राज्य निवडणूक आयोगाने या आधी 5 ऑगस्ट रोजी 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती. तर दुसरीकडं राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

तरीही ग्रामविकास विभागाने एक राजपत्रक काढून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्यानं येत्या काही काळात निवडणूक जाहीर होणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच आगामी काळातील निवडणुकांसाठी राजकीय पक्ष त्यांची माेर्चेबांधणी सुरु करतील अशी चर्चा आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा आणि त्यांचे जिल्हानिहाय आरक्षण, पहा…

नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग
उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला)
परभणी : अनुसूचित जाती
जालना : नागरिकांचा मागस प्रवर्ग
लातूर : सर्वसाधारण( महिला)
हिंगोली : सर्वसाधारण (महिला)

अमरावती : सर्वसाधारण (महिला)
ठाणे : सर्वसाधारण
पालघर : अनुसूचित जमाती
रायगड : सर्वसाधारण
रत्नागिरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग : सर्वसाधारण

नाशिक : सर्वसाधारण (महिला)
धुळे : सर्वसाधारण (महिला)
जळगाव : सर्वसाधारण
नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला)

औरंगाबाद : सर्वसाधारण
बीड : अनुसूचित जाती
अकोला : सर्वसाधारण (महिला)
यवतमाळ : सर्वसाधारण
बुलढाणा : सर्वासाधारण

वाशिम : सर्वसाधारण
नागपूर : अनुसूचित जमाती
वर्धा : अनुसूचित जाती (महिला)
चंद्रपूर : अनुसूचित जाती (महिला)

पुणे : सर्वसाधारण
अहमदगर : अनुसूचित जमाती
भंडारा : अनुसूचित जमाती (महिला)
गोंदिया : नागरिकांचा मागस प्रवर्ग
गडचिरोली : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)

सोलापूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग
सातारा : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला)
सांगली : सर्वसाधारण (महिला)
कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला)