Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन ; आंदोलनांचा बुलंद आवाज हरपल्यानं सर्वत्र हळहळ…

शेतीशिवार टीम : 14 ऑगस्ट 2022 :- शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता.

गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने पहाटे साडेपाच वाजता विनायक मेटे यांची गाडी खोपली परिसरातील बातम बोगद्याजवळ डोंगर कपारीला धडकली. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी पनवेलमधील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला.

पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही.

त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखरेचा श्वास घेतला.

विनायक मेटे यांचा अखेरचा फोटो समोर 

 

कोण होते विनायक मेटे

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.

मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.

अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी

सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार

त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य