Take a fresh look at your lifestyle.

5 वर्षात डॉ. सुजय विखेंनी कमावले इतके कोटी ! संपत्तीत झाली तब्बल दुप्पटीने वाढ..

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी अहमदनगर दक्षिण मतदार संघातील निवडणूक प्रचारात रंगत आली आहे. आज नगर दक्षिण मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज सोमवारी (ता.22) दाखल केला.

सुजय विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंकेचे कडवे आव्हान असणार आहे.

अर्जासोबत शपथपत्रात सुजय विखेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, डॉ. सुजय विखे हे तब्बल 29 कोटी 18 लाख 88 हजार 999 रुपये इतक्या संपत्तीचे मालक आहे.

लोकसभा 2019 च्या लोकसभा निवडणूकीतील शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांच्या नावावर 11 कोटी 17 इतकी संपत्ती होती तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण होत्या. आता 5 वर्षानंतर सुजय विखे यांची संपत्तीत तब्बल दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

सुजय विखे व पत्नी धनश्री यांची संपत्ती..

डॉ. सुजय विखे यांच्या नावे 12 कोटी 15 लाख 69 हजार 585 रुपयाची स्थावर मालमत्ता आहे. तसेच 10 कोटी 95 लाख 70 हजार 893 रुपयाची जंगम मालमत्ता आहे.

सुजय विखे पाटील यांच्या नावे नमूद करण्यात आलेल्या स्थावर आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचे मूल्य 23 कोटी 11 लाख 40 हजार 478 इतके नमूद करण्यात आले आहे.

तसेच त्यांच्या पत्नी धनश्री सुजय विखे पाटील यांच्या नावावर 3 कोटी 88 लाख 32 हजार 823 रुपयांची जंगम आणि एक कोटी 19 लाख 89 हजार 440 रुपयांची स्थावर अशी एकूण 5 कोटी 8 लाख 21 हजार 263 मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.

तसेच त्यांच्या दोन मुलांच्या नावे एकूण 99 लाख 26 हजार 298 रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे.

सुजय विखेंवर साडेतीन कोटींचे कर्ज..

सुजय विखेंच्या वैयक्तिक स्वतःच्या नावे 3 कोटी 64 लाख 13 हजार 209 रुपयाचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे. या शपथपत्रात विखे यांनी त्यांच्याकडे असलेल्या दागिन्यांची एकूण किंमत 35 लाख 33 हजार 513 असल्याचे शपथपत्रात विखे यांनी नमूद केले आहे. तर पत्नीकडे असलेल्या दागिन्यांची किंमत 45 लाख 10 हजार 101 असल्याचे त्यांनी नमूद केले आहे..