Take a fresh look at your lifestyle.

Board Exam 2022 । आता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणार अर्धा तास अधिक वेळ ; असं आहे, मार्क्सनुसार वेळेचं Timetable…

शेतीशिवार टीम,21 डिसेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जारी केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले.

दरम्यान दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. 10 वी आणि 12 वीचा तीन तासांचा असणारा पेपर यंदा साडे तीन तासांचा असणार आहे. म्हणजेच जादा अर्धा तास वाढवून दिला आहे.

राज्य शासनाच्या नव्या नियमानूसार यंदा विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास वाढवून मिळणार आहे. कोरोनाच्या महामारीत ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या 10 वी-12 वीच्या लेखी परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळणार आहे.

‘शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कोरोना महामारीत ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होते. परिणामी विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे.

हे लक्षात घेऊन, राज्य मंडळाने यंदाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे 70, 80 आणि 100 गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास वाढवून दिला जाणार आहे.

तर 40, 50 आणि 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत.’ असं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं आहे.