राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 5 वाण,3 कृषी यंत्रे अवजारे आणि 69 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली आहे. याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी.जी. पाटील यांनी पत्रकात सांगितले, की महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीन दिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास महात्मा फुले कृषी विद्यापीठात करण्यात समितीच्या 51व्या बैठकीचे आयोजन आले होते. कुलगुरू डॉ. पाटील यांच्या संशोधन डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक नेतृत्वाखाली या शिफारशी सादर करण्यात आल्या होत्या .

यामध्ये भात – फुले कोलम,भात-फुले सुपर पवना,मका-फुले उमेद,मका- फुले चॅम्पीयन,ऊस – फुले 13007 हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलीत फुले पुणे ऊस,पाने काढणी व कुट्टी यंत्र, विद्युतमोटारचलीत फुले भुईमुग शेंगा फोडणी व वर्गवारी यंत्र, फुले रस काढणी यंत्र प्रसारीत करण्यात आले असल्याची माहिती डॉ. गोरंटीवार यांनी दिली .

प्रसारीत वाण पुढीलप्रमाणे आहेत. भात-फुले कोलम: हा अधिक उत्पादन देणारा निमगरवा,आखूड बारीक दाण्याचा वाण पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. भात- फुले सुपर पवना : हा अधिक उत्पादनक्षम,बुटका,निमगरवा,सुवासीक,लांबट बारीक दाण्यांसह तांदळाची उत्तम गुणवत्ता असलेला वाण पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. मका – फुले उमेद हा अधिक धान्य उत्पादन देणारा आणि

मध्यम कालावधीत पक्कहोणारा संकरीत वाण महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. मका- फुले चॅम्पीयन हा अधिक उत्पादन देणारा, लवकर पक्व होणारा संकरीत वाण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात आला आहे. ऊस- फुले 13007 हा ऊस पिकाचा वाण राष्ट्रीय पातळीवर द्विपकल्पीय प्रदेशासाठी प्रसारित करण्यात आला आहे .

प्रसारीत यंत्रे : उसाची पाने काढणे व कुट्टी करण्यासाठी ट्रॅक्टरचलीत फुले ऊस पाने काढणी व कुट्टी यंत्र प्रसारित करण्यात आले आहे. भुईमुग शेंगा फोडणे तसेच शेंगदाणे, फुटके शेंगदाणे, शेंगा आणि टरफले वेगवेगळे करण्यासाठी विद्युत मोटारचलीत फुले भुईमुग शेंगा फोडणी व वर्गवारी यंत्र प्रसारित करण्यात आले आहे. फळे आणि भाज्यांमधून रस काढण्यासाठी फुले रस काढणी यंत्र छोट्या प्रक्रिया उद्योजकांसाठी प्रसारीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *