MG Motor India ने नुकत्याच लॉन्च केलेल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन MG Comet EV च्या तिन्ही व्हेरियंटच्या किमती जाहीर केल्या आहेत. कंपनीचे पॉवरफुल आणि न्यू इलेक्ट्रिक वाहन MG Comet EV चे 3 व्हेरियंट आहेत आणि तिन्ही व्हेरियंटची किंमती वेगळ्या आहे.
कंपनीच्या बेस मॉडेल PACE ची एक्स – शोरूम किंमत रु. 7.98 लाख आहे. या व्यतिरिक्त, कंपनीने Comet EV चे आणखी 2 व्हेरियंट देखील लॉन्च केले आहेत, ज्याच्या किंमती देखील जाहीर केल्या आहे. ही कंपनीची सर्वात छोटी कार आहे आणि कंपनीने तिच्या पेस, प्ले आणि प्लश या 3 व्हेरियंतच्या किंमती जाहीर केल्या आहेत.
तीनही व्हेरियंटच्या किंमती पहा..
MG Comet EV ‘PACE’ – ₹7.98 लाख
MG Comet EV ‘PLAY’ – ₹9.28 लाख
MG Comet EV ‘PLUSH’ – ₹9.98 लाख
कंपनीने आपल्या पॉवरफुल इलेक्ट्रिक वाहन कार MG Comet EV च्या किमती उघड करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला. या इव्हेंटमध्ये कंपनीने तिन्ही व्हेरियंटची माहिती दिली आणि किंमतीही जाहीर केल्या. याशिवाय या कारचे बुकिंग कधी सुरू होणार आहे याबद्दलही कंपनीने माहिती दिली आहे.
MG Comet EV | Price Launch
Introducing MG Comet, the Smart EV packed with the coolest features. Check out the specifications and price of India's no-nonsense car Comet EV, here. https://t.co/FNuWXHcDTb— Morris Garages India (@MGMotorIn) May 5, 2023
एमजी Comet ईव्हीचे बुकिंग 15 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. याशिवाय प्री – बुकिंग सुरू झाली आहे. याशिवाय, कंपनी ग्राहकांना एक अनोखा अनुभव देखील देत आहे, ज्याद्वारे त्यांना प्रॉडक्शन सर्व्हिसपासून ते MG Comet च्या डिलिव्हरीच्या स्टेटसपर्यंत ट्रॅक आणि ट्रेस अँपद्वारे माहिती मिळेल. 22 मे पासून कंपनी कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे.
MG Comet EV चा बायबॅक प्लॅन..
कंपनीने आपल्या खरेदीदारांसाठी बायबॅक योजना देखील सुरू केली आहे. या अंतर्गत ग्राहक आपली कार कंपनीला पुन्हा विकू शकतो. ज्यामध्ये कंपनी 3 वर्षांच्या मालकीनंतर इलेक्ट्रिक वाहनाच्या मूल्याच्या 60 टक्के रक्कम ग्राहकांना परत करणार आहे.
1000 Km राइडसाठी फक्त ₹ 519 खर्च..
या EV ला पूर्ण चार्ज केल्यानंतर 230 किलोमीटरची रेंज मिळेल. ही कार 519 रुपयांमध्ये 1000 किलोमीटर धावेल असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये नेक्स्ट लेव्हल पर्सनलायझेशन देण्यात आले आहे, म्हणजेच तुम्ही कंपनीने बनवलेले फंकी बॉडी रॅप्स, कूल स्टिकर्स कारवर लावू शकाल.
कारमध्ये फोल्डेबल स्प्लिट सीट कॉन्फिगरेशन देण्यात आले आहे. म्हणजेच, तुम्ही बूट स्पेस वाढवू शकता. कंपनीने यात 5 कलर ऑप्शन्स दिले आहेत. हे ऍपल ग्रीन विथ ब्लॅक रूफ, अरोरा सिल्व्हर, स्टाररी ब्लॅक, कँडी व्हाईट आणि ब्लॅक रूफसह कॅंडी व्हाइटमध्ये ऑफर केले आहे.
MG Comet EV बॅटरी आणि रेंज :-
MG Comet EV मध्ये 17.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक आहे, जो एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 230 किलोमीटरपर्यंत रेंज मिळण्याचा दावा केला आहे, कंपनीच्या दाव्यानुसार. Comet EV मध्ये एकच मोटर आहे, जी 41.4 Hp पॉवर आणि 110 Nm पिकअप टॉर्क जनरेट करते. 3.3 किलोवॅट चार्जरच्या मदतीने तुम्ही ही इलेक्ट्रिक कार घरबसल्या 7 तासांत पूर्ण चार्ज करू शकता..