ड्रॅगन फ्रुटची लागवड कमी पावसाच्या भागातील शेतकऱ्यांसाठी कमी मेहनत व कमी खर्चामध्ये करता येते. एकात्मिक फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी 1 लाख 60 हजारांचे अनुदान देण्यात येते हे तर आपल्याला माहतीच आहे. मात्र 2022 मध्ये मनरेगाच्या अंतर्गत ड्रॅगन फ्रुटचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. केळी, द्राक्ष, अवैकॅडो बरोबर ड्रॅगन फ्रुटला सुद्धा आता अनुदान द्यायला सुरूवात झालीआहे.
ज्यासाठी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान ड्रॅगन फ्रुटसाठी दिलं जात आहे. हे अनुदान तीन वर्षांमध्ये विभागून दिलं जातं. या योजनेसाठी पात्रतेचे निकष यासाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची माहिती आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया.
ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीकरता अनुदान देण्यासाठी 30 मार्च 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये द्राक्ष, केळी, ड्रॅगन फ्रुट याच प्रमाणे फुल पिकांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीकरता खालील लाभधारकांना लाभ घेता येईल.
अ) अनुसूचित जाती (Schedule Caste)
ब) अनुसुचितजमाती (Schedule Tribes)
क) भटक्या जमाती (Nomadic Tribes)
ड) निरधिसूचित जमाती (विमुक्त जमाती De-notified Tribes)
इ) दारिद्र रेषेखालील इतर कुटुंबे (Families below the poverty line)
फ) स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे (Women-headed households)
ग) दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे (physically handicapped headed Households)
ह) जमीन सुधारणांचे लाभार्थी (benificiaries of land reforms)
ई) प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण योजनेखालील लाभार्थी.
ज) “अनुसुचित जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्के मान्य करणे) अधिनियम, 2006 (2007 चा 2) खालील पात्र लाभार्थी
वरती नमूद केलेल्या प्रवर्गामधील (अ) ते (ज) पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात येईल. कृषि कर्ज माफी योजना 2008 मध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या अल्प भूधारक 1 हेक्टरपेक्षा जास्त पण 2 हेक्टर (5 एकर) पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना व सीमांत भूधारक शेतकरी [1 हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक किंवा कूळ)] याच्या जमीनीवरील कामांना अटी व शर्तीनुसार प्राधान्य देण्यात यावे.
वरील “अ” ते “ज” प्रवर्गातील कोणतीही मग्रारोहयो जॉबकार्ड धारक व्यक्ती वैयक्तीक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
एकात्मिक फलोत्पादन योजनेच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुटसाठी 1 लाख 60 हजारांचे अनुदान :-
2. क्षेत्र मर्यादा
या योजनेअंतर्गत फळझाड/ वृक्ष / फूलपिक लागवडीसाठी कमीत कमी 0.05 हेक्टर व जास्तीत जास्त 2.0 हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा असणार आहे. शिवाय इच्छुक लाभधारकांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ही जमीन कूळ कायद्याखाली येत असल्यास व 7/12 च्या उताऱ्यावर कूळाचे नाव असेल तर योजना राबवीत असताना कूळाची संमती देखील घ्यावी लागणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने ग्रामपंचायत मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जास ग्रामसभेमध्ये मंजुरी दिली जाईल आणि अशा मंजुरी मिळालेल्या लाभधारकांना पुढे या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाईल. अशा प्रकारच्या अटी शर्ती पात्रतेच्या आधारे ही योजना राबवली जाते.
1 एप्रिल 2022 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून मनरेगाच्या अंतर्गत मजुरीचा दर बदलून 256 रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे फळबाग लागवडीचे इस्टिमेट सुद्धा बदललेले आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रुटसाठी 15 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या नवीन इस्टिमेट नुसार तीन वर्षांसाठी 2 लाख 28 हजार 31 रुपये एवढा अनुदान दिले जाणार आहे.
ज्यामध्ये पहिल्या वर्षी सामुग्रीचा व मजुरीचा खर्च 1 लाख 79 हजार 901 रुपये, दुसऱ्या वर्षासाठी 25,815 रुपये आणि तिसऱ्या वर्षासाठी 26,000 रुपये असे मिळून 2 लाख 28 हजार 31 रुपये एवढे अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे.