MHADA Konkan Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीबाबत मोठं अपडेट, ‘या’ दिवशी 5 हजार 311 घरांची सोडत निघणार !

0

म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या 5 हजार 311 घरांची सोडत 26 जानेवारीला पार पडणार असल्याचे म्हाडातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. ठाण्यातच ही सोडत पार पडणार असून, या सोडतीसाठी 30 हजार अर्ज दाखल झाले आहेत.

ठाणे शहर व जिल्हा, पालघर , रायगड , सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या 5311 सदनिकांच्या विक्रीसाठी 13 डिसेंबर, 2023 रोजी आयोजित ऑनलाइन संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळवण्यात येणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते 15 सप्टेंबर, 2023 रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला होता. अर्जदारांच्या सोयीकरता मंडळातर्फे सोडतीत सहभागी होण्याकरता मुदतवाढ देण्यात आली.

या सोडतीसाठी एकूण 30,687 अर्ज प्राप्त झाले असून, अनामत रकमेसह 24,303 अर्ज प्राप्त झाले आहेत. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 4 डिसेंबर, 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध करण्यात आली. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 11 डिसेंबर, 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

कोंकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1010 सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या नागरिकांनी योजनेंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. कोंकण मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत 1037 सदनिका, सर्वसमावेशक योजनेंतर्गत 919 सदनिका, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी 67 सदनिका आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेव्यतिरिक्त इतर सर्व योजनांकरता 20 टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.