MHADA Mumbai Lottery : गोरेगाव, लिंक रोडला फक्त 25 लाखांत फ्लॅट, ‘या’ तारखेला जाहिरात प्रसिद्ध होणार, पहा डिटेल्स..

0

मुंबईत स्वत:च्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MHADA) तयारी केली आहे. सुमारे साडेतीन हजार घरांसाठी म्हाडा प्रशासनाकडून मे अखेरीस जाहिरात दिली जाणार आहे.

तर जुलै ते ऑगस्टदरम्यान घरांची लॉटरी निघणार आहे. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक प्रकल्पांमध्ये म्हाडाची घरे आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या घरांची यादी तयार करण्यात येत आहे. सर्व अभियंत्यांकडून त्यांच्या आवारातील पूर्ण झालेल्या घरांची माहिती गोळा केली जात आहे.

आठवडाभरात हे काम पूर्ण होईल. गोरेगावच्या दोन प्रकल्पांमध्ये सुमारे 2600 घरे पूर्ण झाली आहेत. म्हाडाच्या प्रकल्पांशी संबंधित इतर साइटवरून माहिती मिळाल्यास लॉटरीत समाविष्ट होणाऱ्या घरांची संख्या आणखी वाढू शकते. येत्या 15 ते 20 दिवसांत लॉटरीसाठी जाहिराती दिल्या जाणार आहे.

खासगी बिल्डरांशी थेट टक्कर..

म्हाडाने गोरेगावमध्ये खासगी बिल्डरांच्या प्रकल्पांना टक्कर देणारी घरे बांधली आहेत. म्हाडाच्या इमारतींमध्ये प्रथमच जिम, स्विमिंग पूलसह इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हाडाने गोरेगावमधील लिंक रोड आणि एसव्ही रोडजवळ असे दोन प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत.

लिंक रोडवरील मेट्रो स्टेशनजवळ स्थित, प्लॉट ए प्रकल्पात इकॉनॉमी वीकर सेक्शन (EWS) मध्ये प्रत्येकी 23 मजल्यांच्या सात इमारतींचा समावेश आहे. यामध्ये 322 चौरस फुटांची 1239 घरे आहेत. तर, एसव्ही रोडजवळील प्लॉट बी वरील 4-4 इमारती EWS आणि LIG (लोअर इन्कम ग्रुप) च्या आहेत. त्यांची अनुक्रमे 708 आणि 736 घरे लॉटरीत निघणार आहेत.

25 ते 45 लाखांत मिळणार घरे..

मुंबईतील तयार घरांची किंमत म्हाडाने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, EWS घरांच्या किमती जवळपास 25 लाख रुपये आणि LIG घरांच्या किमती 45 लाखांच्या आसपास ठेवणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

अजून प्रतीक्षा करण्याची गरज नाही..

2019 ही शेवटची म्हाडाची लॉटरी मुंबईत निघाली होती. गेल्या चार वर्षांपासून लोक लॉटरीची वाट पाहत आहेत. मात्र यावेळी म्हाडाने सोडत प्रक्रियेत बदल केल्याने लोकांची घरांची प्रतीक्षा लांबली आहे. नवीन नियमानुसार ज्या इमारतींना OC आणि CC मिळाले आहे.

अशा इमारतींचाच लॉटरीत समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याआधी लॉटरी विजेत्यांना घराच्या चाव्या मिळण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागत असे. म्हणूनच सरकारने सर्व नियमांची पूर्तता करणारी घरेच लॉटरीचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.