शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : सर्वसामान्यांची साथी कामेही शासनदरबारी प्रलंबित राहू नयेत ,यासाठी लवकरच ‘जनता दरबार’ भरवून नागरिकांच्या समस्या सोडवणार असल्याची ग्वाही आमदार ॲड. अशोक पवार यांनी दिली. यावेळी पवार यांनी शिरुर तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागाच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली.
वाडा पुनर्वसन ( ता . शिरूर ) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्गखोल्या बांधकामाच उद्घाटन आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दर महानगर नियोजन समिती सदस्य यशवंत गव्हाणे,
घोडगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठलराव ढरंगे माजी पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, सरपंच नवनाथ माळी उपसरपंच सुरेखा दारे , माजी सरपंच विजय गव्हाणे,
माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे, तंटामुक्त अध्यक्ष नितीन ढोरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उषा भोकटे तसेच वाहा पुनर्वसन प्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी आजवर सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्नांना सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे सांगत गरिबांना छोट्या छोट्या प्रश्नांसाठी प्रशासनाकडे हेलपाटे मारायची वेळच येऊ नये, यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह ‘जनता दरबार’ भरवणार असल्याचे नमूद केले. दरम्यान यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचनही करण्यात आले.