‘या’ स्वस्त SUV ने लोकांना अक्षरशः वेड लावलं, महिनाभरात1 लाखांहून अधिक बुकिंग ; असं काय आहे SUV मध्ये खास, पहा डिटेल्स….

0

शेतीशिवार टीम : 30 ऑगस्ट 2022 :- स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल्स (SUV) वाहनांची क्रेझ लोकांच्या मनात वाढत आहे, गेल्या काही वर्षांत कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट किफायतशीर असल्याने खूप प्रसिद्ध होत चालली आहे. अलीकडेच, मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध SUV मारुती ब्रेझाचे अपडेटेड मॉडेल देखील लॉन्च केलं आहे. या SUV ने बाजारात येताच धमाल सुरू केली असून अवघ्या दोन महिन्यांतच 1 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग झालं आहे.

कंपनीने 20 जून रोजी या SUV ची बुकिंग सुरू केली होती आणि 30 जून रोजी त्याची किंमत जाहीर करण्यात आली होती. आकर्षक लुक आणि दमदार इंजिन पॉवरने डेकोरेट केलेल्या या SUV ची किंमत 7.99 लाख ते 13.69 लाख रुपये (Ex-showroom) ठेवण्यात आली आहे.

अवघ्या 60 दिवसांत 1 लाख युनिट्सच्या बुकिंगमुळे या SUV च्या वेटिंग पिरियडमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 8 महिन्यांपेक्षा जास्त व्हेटिंग पिरियड दिला जात आहे. दुसरीकडे, मारुती सुझुकीची मिड-साइज़ SUV ग्रँड विटाराचाही (Grand Vitara) प्रेशर आहे. जी पुढील महिन्यात बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने ही SUV जगासमोर लॉन्च केली असली आणि आता तिच्या किमती अजून समोर आलेल्या नाहीत. कंपनी नेक्सा डीलरशिपद्वारे आपली पहिली मिड साईज SUV विकणार आहे.

Maruti च्या अपडेटेड Brezza ने लोकांना वेड का लावलं ?

जेव्हा न्यू मारुती ब्रेझाचा (Brezza) विचार केला जातो, तेव्हा कंपनीने या SUV च्या इंजिन मॅकेनिज्ममध्ये कोणतेही बदल केले नाहीत, यामध्ये आधीच्या मॉडेलप्रमाणेच 1.5 लिटर क्षमतेचे K15C इंजिन वापरलं आहे, जे तुम्हाला मारुती XL6 आणि Ertiga मध्ये मिळतं. हे इंजिन स्टॅंडर्ड 5-स्पीड ट्रान्समिशन गियरबॉक्सशी जोडलेलं आहे आणि 103hp च्या पॉवरसह 137Nm टॉर्क जनरेट करतं. कंपनी याला 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनसह देखील देत आहे. कंपनीचा दावा आहे की, या SUV चे मॅन्युअल वेरिएंट 20.15 kmpl आणि ऑटोमॅटिक वेरिएंट 19.80 kmpl पर्यंत मायलेज देते.

ही SUV सुझुकीच्या Global (C) प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनीने या SUV च्या अँक्सटीरियरपासून इंटिरियरपर्यंत अनेक बदल केले आहेत. SUV मधील केबिन पूर्णपणे ड्युअल टोन (ब्लॅक -ब्राऊन) पेंट स्कीमने सजवण्यात आली आहे, जसे तुम्ही बलेनोवर पाहता.

याशिवाय डॅशबोर्डपासून ते डोअरपर्यंत अनेक ठिकाणी सिल्व्हर अ‍ॅक्सेंट वापरण्यात आलं आहेत, जे केबिनला थोडा प्रीमियम लुक देतात. डॅशबोर्डला सिल्व्हर आणि ब्राऊन फिनिश देण्यात आलं आहे आणि स्विच गीअर्स, नवीन स्टीयरिंग व्हील आणि सीट डिझाइन केबिनमध्ये आकर्षक प्रीमियम फिनिश देण्यात आले आहे.

या फीचर्समुळे Brezza बनली आहे खास…

मारुती ब्रेझाच्या टॉप व्हेरियंटमध्ये आता अँड्रॉइड ऑटो आणि अँप्पल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह नवीन 9.0-इंच SmartPlay Pro+ टचस्क्रीन, Arkamys साउंड सिस्टीम, वायरलेस चार्जिंग, रीअर एसी व्हेंट्स, व्हॉईस कमांड सपोर्ट, कनेक्टेड कार टेक, हेड्स-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोलसारखे फीचर्स मिळते. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अँम्बियंट लाइटिंग, USB टाइप-सी रिअर चार्जिंग पोर्ट, कनेक्टेड कार टेक, अलेक्सा कंपॅटिबिलिटी आणि सनरूफ यासारख्या फीचर्समुळे ही SUV आणखी खास बनते.

यामध्ये मिड-स्पेक व्हेरियंटमध्ये 7-इंच टचस्क्रीन युनिट आहे, जे आधीच्या मॉडेलमध्ये देखील होतं. SUV मधील इतर सेफ्टी फीचर्समध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), हिल होल्ड असिस्ट, बॅकसीटवर असलेल्या मुलांसाठी ISOFIX रिअर अँकर आणि 360-डिग्री कॅमेरासारखे फीचर्स पहिल्यांदाच मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.