शेतकरी पुत्रांनो, हिवाळ्यात छोट्याशा जागेत ‘हा’ शेतीपूरक बिझिनेस करा स्टार्ट; खर्च 1 पट तर नफा 10 पट मिळवाल, पहा, Business Idea…
भारत देशात ऋतूनुसार वेगवेगळे शेतीपूरक व्यवसाय केले जातात. आता हिवाळा सुरू झाला आहे. लवकरच बाजारात शेतकऱ्यांचा नवा वाटाणा दाखल होणार आहे.वाटाणा पिकातून शेतकरी केवळ 3-4 महिन्यांत भरपूर कमाई करतात. पण तुम्ही जर हुशारी दाखवली तर मोठा नफा कमावता येतो. मंडईत थेट विक्री न करता वाटण्यापासू न फ्रोझन मटार बनवू शकता.
अशा प्रकारे तुम्ही फ्रोझन मटारचा म्हणजेच ग्रीन पीसचा व्यवसाय सुरू करू शकता. वाटण्याला वर्षभर मागणी असते, मात्र हिरवा वाटाणा फक्त हिवाळ्यातच मिळतो. लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांमध्ये ग्रीन पीसपासून अनेक प्रकारच्या व्हेज डिशेस आणि इतर गोष्टी बनवल्या जातात.
तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्या रूममधून ग्रीन पीसचा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा असेल तर 4 हजार ते 5 हजार चौरस फूट जागा आवश्यक आहे. तसेच, लहान प्रमाणात व्यवसाय सुरू करताना हिरवे वाटाणे सोलण्यासाठी काही मजुरांनाही काम मिळू शकतं. पण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला वाटाणा सोलण्याची मशीन घेऊ शकता.तसेच काही परवाने देखील घ्यावे लागतील.
कसा सुरु कराल ग्रीन पीसचा बिझनेस :-
ग्रीन पीसचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हिवाळ्यात शेतकऱ्यांकडून तुम्हाला हिरवे वाटाणे खरेदी करावे लागतात. साधारणपणे नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यापर्यंत ताजे हिरवे वाटाणे सहज उपलब्ध होतात. तुम्ही तुमच्या घरातील एका छोट्या खोलीतून ग्रीन पीसचा व्यवसाय सुरू करू शकता. शेतकऱ्यांकडून वाटाणे खरेदी केल्यानंतर तुम्हाला सोलणे, धुणे, उकळणे आणि पॅकिंग इत्यादी कामांसाठीसाठी मजुरांची आवश्यकता असेल. सर्व वाटाणे एकाच वेळी विकत घ्यावे लागतील असे नाही. आपण दररोज वाटाणे खरेदी करून त्यावर प्रक्रिया करू शकता.
CMEGP: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: असा करा अर्ज, आणि मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज
किती होईल कमाई
ग्रीन पीसचा व्यवसाय सुरू केल्यास किमान 50-80 टक्के नफा मिळू शकतो. हिरवा वाटाणा शेतकऱ्यांकडून 10 रुपये किलो या दराने खरेदी करता येतो. यामध्ये दोन किलो वाटाण्यामध्ये सुमारे 1 किलो वाटाण्याचे दाणे मिळतात. जर तुम्हाला वाटाणा बाजारात 20 रुपये किलो दराने मिळत असेल, तर तुम्ही या वाटाण्यांवर प्रक्रिया करून ते 120 रुपये किलो दराने विकू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही ग्रीन पीसची पाकिटे थेट किरकोळ दुकानदारांना विकली तर तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो.
CMEGP: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना: असा करा अर्ज, आणि मिळवा ५० लाखांपर्यंत कर्ज
ग्रीन पीस कसे बनवायचे ते जाणून घ्या..
ग्रीन पीस बनवण्यासाठी, वाटाणे प्रथम सोलले जातात. यानंतर सुमारे 90 अंश सेंटीग्रेड तापमानात उकळले जातात. नंतर वाटाण्याचे दाणे 3-5 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत थंड पाण्यात टाकले जातात, जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया नष्ट होतील. यानंतर, पुढील काम हे वाटाणे -40 अंशांपर्यंत तापमानात ठेवणे आहे. जेणेकरून वाटाण्यात बर्फ गोठेल. मग ग्रीन पीस वेगवेगळ्या वजनाच्या पॅकेटमध्ये पॅक करून बाजारात पोहोचवले जातात.