शेतीशिवार टीम, 28 जून 2022 :- 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक तरुण मुले सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करू लागतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष स्पर्धा परीक्षकांकडे वळतं, मग त्यामध्ये UPSC/ MPSC या अवघड परीक्षा पास करणं त्यांचं ध्येय बनतं.
उमेदवारांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, स्पर्धा कोणतीही असो. तयारीसाठी, अभ्यासक्रमानंतर, जास्तीत जास्त लक्ष सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडींवर केंद्रित केले पाहिजे.
कारण लेखी परीक्षा असो किंवा उमेदवारांची मुलाखत असो, येथे अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यातील काही प्रश्न अवघड असतात तर काही प्रश्न सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आपण सामान्य ज्ञानाचे असेच काही प्रश्न जाणून घेणार आहोत…
प्रश्न : संयुक्त राष्ट्र संघटनेचे विद्यमान महासचिव कोण आहे ?
उत्तर : ऑलिव्हिरा गुटेरेस (António Guterres) हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे विद्यमान महासचिव आहे. ते एक पोर्तुगीज राजकारणी आणि मुत्सद्दी आहेत. ते 2017 पासून, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस म्हणून काम करत आहे, ही पदवी धारण करणारे ते नववे व्यक्ती आहेत. पोर्तुगीज समाजवादी पक्षाचे सदस्य ते गुटेरेस यांनी 1995 ते 2002 पर्यंत पोर्तुगालचे पंतप्रधान म्हणून काम केलं आहे.
प्रश्न : भारतातलं सर्वात मोठं बस स्थानक कोणतं आहे ?
उत्तर : चेन्नई मधलं माधवरम मोफसिल बस टर्मिनस हे आधुनिक बस टर्मिनस आहे. 37 एकरात पसरलेले हे आशियातील सर्वात मोठे बसस्थानक आहे. त्याला त्याची गुणवत्ता आणि व्यवस्थापनासाठी ISO 9001:2000 गुणवत्ता प्रमाणपत्र मिळालं आहे. 18 नोव्हेंबर 2002 रोजी त्याचे उद्घाटन झालं होतं.
प्रश्न : भारतात सर्वात लांब (Longest) ट्रेन कोणती धावली ?
उत्तर : भारताच्या इतिहासातील सर्वात लांब ट्रेनचे नाव ‘शेषनाग’ आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने 2 जुलै 2020 रोजी महाराष्ट्रातील नागपूर आणि छत्तीसगडमधील कोरबा दरम्यान शेषनाग ट्रेन चालवली. या ट्रेनची लांबी 2.8 किलोमीटर लांब होती.त्यात एकूण 251 वॅगन बसवण्यात आल्या होत्या. यादरम्यान या ट्रेनने 250 किमीचे अंतर अतिशय आरामात कापलं होतं.
प्रश्न : भारतातील सगळ्यात पहिल्या चित्रपटाचे नाव काय आहे ?
उत्तर : भारतातील पहिला चित्रपट 1913 मध्ये बनला होता. त्या चित्रपटाचे नाव होते ‘राजा हरिश्चंद्र’. त्यावेळी तंत्रज्ञान फार विकसित नव्हते, त्यामुळे भारतात बनलेला पहिला चित्रपट हा मूकपट होता.
भारताचा पहिला चित्रपट मूक होता पण त्यातही गोष्टी शब्दात मांडल्या गेल्या. या चित्रपटाच्या शीर्षकात इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तीन भाषांचा वापर करण्यात आला आहे. हा चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची लांबी 40 मिनिटे होती.
या चित्रपटाची निर्मिती दादासाहेब फाळके यांनी केली होती. या चित्रपटात अभिनेते दत्तात्रय दामोदर दाबके, अण्णा साळुंके, भालचंद्र डी.फाळके, जी. व्ही. साने, डी. डी. दाबके, पी. जी. साने, अण्णा साळुंके, भालचंद्र फाळके, दत्तात्रेय, क्षीरसागर, दत्तात्रेय तेलंग, गणपत शिंदे, विष्णू हरी औंढाकर आणि नाथ तेलंग. हरिश्चंद्र चित्रपटाची कथा राजा हरिश्चंद्र यांच्या जीवनावर आधारित होती. राजा हरिश्चंद्र हा इतिहासाचा महान राजा होता. रामायण, महाभारत, देवी भागवत पुराण इत्यादी अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख आढळतो…
प्रश्न : भारतातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे ?
उत्तर : भारतातील एकूण जिल्ह्यांची संख्या 2022 = 679 + 46 = 725 आहे. भारतातील 28 राज्यांचा समावेश असलेल्या जिल्ह्यांची संख्या 679 आहे. भारतातील 9 केंद्रशासित प्रदेशांसह जिल्ह्यांची संख्या 46 आहे.
प्रश्न : महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?
उत्तर : उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं जन्मलेले श्री प्रकाश हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. 1956 ते 1962 या काळात त्यांनी आधी मुंबई प्रांताचं आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं.
प्रश्न : बौद्ध धर्मातील 2 पंथ कोणते ?
उत्तर : महायान आणि हिनयान
प्रश्न : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला ?
उत्तर : 6 जून 1974
प्रश्न : महाराष्ट्राचे 11 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषलेल्या व्यक्तीचं नाव अन् मतदार संघ कोणता ?
उत्तर : वसंतराव नाईक ‘यवतमाळ’ जिल्ह्यातील पुसद हा त्यांचा मतदार संघ होता. 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं.
प्रश्न : भारताच्या पहिल्या वन – डे संघाचा कॅप्टन कोण होता ?
उत्तर : अजित वाडेकर । भारताने 13 जुलै 1974 रोजी लीड्सच्या मैदानावर अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्या सामन्यात भारतीय संघाला 4 विकेट्सच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.
प्रश्न : लहानपणी बाळाला दुधाळ दात किती असतात ?
उत्तर : 20
प्रश्न : सरपंच आपल्या सरपंच पदाचा राजीनामा कोणाकडे देतो ?
उत्तर :ग्रामपंचायत आपल्या सरपंच आपल्या पदाचा राजीनामा ‘पंचायत समिती सभापती’ यांच्याकडे तर उपसरपंच हा आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंचांकडे देतात.
प्रश्न : भारतरत्न हा सन्मान प्राप्त करणारी पहिली महिला कोण ?
उत्तर : इंदिरा गांधी
प्रश्न : इ.स 1270 मध्ये पंढरपूर येथे जन्म झालेल्या संतांचे नाव काय ?
उत्तर : संत नामदेव