Mumbai Metro 12 : कल्याण, डोंबिवलीकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! कल्याण ते तळोजापर्यंतचा 22Km चा मार्ग मेट्रोने जोडणार, पहा रूट मॅप..
कल्याण, डोंबिवली, तळोजातील प्रवाशांना नवी मुंबई पर्यंत प्रवास करण्यासाठी रस्त्याने किंवा रेल्वेने एक ते दीड तास लागतो. त्यामुळे प्रवाशांना ट्राफिकचा भयंकर त्रास सहन करावा लागतो. परंतु आता या प्रवाशांचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो 12 च्या बांधकामाला गती मिळाली आहे.
मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (MMRDA) या आठवड्यात मुंबई मेट्रोच्या लाईन – 12 च्या बांधकामासाठी निविदा मागवल्या आहेत, जी कल्याण – डोंबिवली – तळोजा यांना जोडली जाणार आहे..
मुंबई मेट्रो लाइन – 12 19 एव्हीलेटेड स्टेशनसह 4,132 कोटी रुपये खर्चून 22.17 किमी लांबीची आंशिक बांधकामाधीन 24.95 किमी लाईन – 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) च्या दक्षिणेकडील एव्हीलेटेड विस्ताराच्या रूपात बांधली जाणार आहे.
मेट्रो 12 कॉरिडॉरची पायाभरणी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सुमारे 5,865 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या एलिव्हेटेड मेट्रो कॉरिडॉरच्या बांधकामात अनेक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते, परंतु मेट्रो – 12 नवी मुंबई मेट्रोला जोडल्यामुळे डिझाइनमध्ये बदल केल्यामुळे MMRDA ला निविदा रद्द करावी लागली होती, परंतु आता पुन्हा एकदा या निविदा मागच्या असून मेट्रो – 12 मार्ग लवकरच सुरु होणार आहे.
हे आहेत 19 स्टेशन्स..
कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निलजे गाव, वडवली (खु), बाळे, वाकलण, तुर्भे, पिसर्वे डेपो, पिसर्वे, तळोजा..
22.17 किमी अंतरावर, मुंबईचे पॅकेज CA – 240 हे भारताच्या मेट्रो बांधकाम इतिहासातील दुसरे सर्वात मोठे नागरी पॅकेज आहे. हैदराबाद मेट्रोची 31 किमी विमानतळ एक्सप्रेस लाइन हे आतापर्यंतचे सर्वात लांब पॅकेज आहे.