शेतीशिवार टीम, 19 ऑगस्ट 2021 :- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईने एक मोठी कामगिरी केली आहे. मुंबई एनसीबीने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी केनियाच्या तीन महिलांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून 937. 78 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. त्यांनी हे सोने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून ठेवले होते. या महिलांनी सोनं तस्करीसाठी अवलंबलेला मार्ग पाहून एनसीबीचे अधिकारीही चक्रावून गेले होते.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिला ड्रग्ज घेऊन मुंबईत येत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. माहितीच्या आधारे, NCB ने विमानतळावर सापळा रचला होता, परंतु तिघींच्या सामानाची झडती घेण्यात आली. परंतु त्यांच्याकडे संशयास्पद काहीही वाढले नाही.

तपासादरम्यान तिघींची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय जेजे रुग्णालयात बॉडी स्कॅन करण्यास पाठवले असता रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी प्रायव्हेट पार्टमध्ये सोनं आढळलं. बॉडी स्कॅनिंगमध्ये सोन्याची तस्करी उघड झाली. या महिलांनी योनी आणि गुदाशयातील पोकळीमध्ये सोनं कंडोममध्ये घालून लपवल होते.

या महिला केनियातील नागरिक असून त्या केनियाहून कतारला गेल्या आणि त्यानंतर मुंबईला आल्या होत्या. एनसीबीने त्या तीन महिलांना कस्टम्सकडे सोपवलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *