Mumbai Police Bharti 2023 : महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार कोणाला म्हटलं जातं? पहा भरतीत विचारलेले 25 प्रश्न अन् उत्तरे.
23. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा – फारकत होणे.
A) वेगळे होणे ( B ) सामावुन घेणे C ) हाकलून देणे D ) बहिष्कृत करणे
24. महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी .. जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
( A ) 25% B ) 30% C ) 40% D ) 50%
25. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौसेमी असेल तर त्याचा परीघ किती असेल ?
A) 132 चौसेमी B) 132 सेमी C) 42 सेमी D) 21 चौसेमी
26. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे ?
( A ) महिला शेतकरी सन्मान वर्ष B ) शैक्षणिक गुणवता वृद्धी वर्ष C) मत्स्यपालन वर्ष (D) भरडधान्य वर्ष
27. 1 जानेवारी 2023 रोजी या देशाने ‘युरो’ हे चलन स्विकारले ?
A) इराण B) इराक C) क्रोएशिया D) युक्रेन
सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्नाच्या शेवटी दिलेली आहेत
28. रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे; पण सुरेशपेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे ?
A) रमेश B) सुरेश C) विजय D) अविनाश
29.जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला, सदर गीत कोणी लिहिले आहे?
A) श्रीनिवास खळे B) शाहीर साबळे C) राजा बढे D) अमर साबळे
30. विषेशनाचा प्रकार ओळखा -“रांगणारे मुल”
A) धतुसाधित B) अव्ययसाधित C) नामसाधित D) सार्वनामिक
31. 0 बहुपदीची कोटी किती असते ?
A) 0 B) 1 C) निश्चित करता येत नाही D) कोणतीही वास्तव संख्या
Police Bharti : 1 ते 22 पर्यंतच्या प्रश्नाची उत्तरे पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा
32. खालीलपैकी मार्च 2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे विभागाने त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या 100% ब्रॉडगेज मार्गाचे विद्युतीकरण साध्य केले ?
A) मध्य रेल्वे B) दक्षिण मध्य रेल्वे C) उत्तर रेल्वे D) दक्षिण किनारी रेल्वे
33. 2023 च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
A) मुंबई B) बंगळुरू C) दीसपुर D) जयपूर
34. जर 4312म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय ?
A) PRICE B) RICEP C) CEPRI D) PIRCE
35. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशांमध्ये अनावरण करण्यात आले?
A) रशिया B) मेक्सिको C) चिली D) पेरू
36.”लहानपण देगा देवा| मुंगी साखरेचा रवा| ऐरावत रत्न थोर |त्यासी अंकुशाचा मार|” या पद्धतीने अलंकार ओळखा
A) उपमा B) दृष्टांत C) उत्प्रेक्षा D) अतिशयोक्ती
37. जर 6: 5 = y तर y ची किंमत खालीलपैकी कोणती ?
A) 15 B) 24 C) 18 D) 22.5
38. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोण जिंकले ?
A) निखत झरीन ( B ) साक्षी मलिक C) अचिंता शेऊली D) मीराबाई चानू
39. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी … करण्यात आली .
A ) जलक्रांती B ) हरितक्रांती C ) औदयोगिक क्रांती D ) धवलक्रांती
40. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश पद भूषविले नाही ?
A ) प्रल्हाद गजेंद्र गडकर B ) शरद बोबडे C) यशवंतराव चंद्रचूड (D) लीला सेठ
41. जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते ?
( A ) 3:2 B) 2:3 D) 3:4 C) 4:3
42. ‘ऐकू येणे’ या अर्थाचा पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार उताऱ्यात आला आहे ?
A) अपेक्षा नसणे B) पायरी न चढणे C) कानावर पडणे D) मुलाखत घेणे
43. 3x + 5y = 9 आणि 5x + 3y = 7 तर x + y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे ?
(A ) 2 B) 16 C) 9 D) 7
44. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
A ) रोजगाराचा अधिकार C) बालकांचे अधिकार B) माहितीचा अधिकार D) समान कामासाठी समान वेतन
45. भारताने …..च्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली.
A) सुनील गावसकर B) कपिल देव C) सय्यद किरमाणी D) संदीप पाटील
46. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक कोणता? H/P : 1/2 | C/R : ?
A) 1/3 B) 1/5 C) 1/6 D) 1/7
47. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा
( A ) माथेरान – थंड हवेचे ठिकाण ( B ) ताडोबा – लेणी
( C ) कोल्हापूर – देवस्थान D ) अजिंठा – जागतिक वारसास्थळ
48. ” तुझे नाव काय ” या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येईल?
A) पूर्णविराम B) अल्पविराम C) प्रश्नचिन्ह D) अर्धविराम
49.1 मिलिमीटरचे 1 सेंटिमीटरशी असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते ?
A) 1 : 100 B) 10 : 1 C) 1:10 . D) 100 : 1
50. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद … यांनी केला.
A) जेम्स मिल B) फ्रेडरिक मॅक्सम्युलर C) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन D) जॉन मार्शल
51) महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार कोणाला म्हटलं जातं ?
A) संत ज्ञानेश्वर B) संत तुकाराम C) संत नामदेव D) संत एकनाथ
पहा संपूर्ण उत्तरे..
23-A
24-D
25-B
26-D
27 – C
28-A
29-C
30-A
31-C
32-A
33-D
34-A
35-A
36-B
37-B
38-D
39-B
40-D
41-D
42-C
43-A
44-B
45-B
46-C
47-B
48-C
49-C
50-B
51) – C