मुंबई – पुणे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेसवेवर ट्रॅफिक मुक्त ठेवण्यासाठी दोन अतिरिक्त लेन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सहा पदरी महामार्गाचे रूपांतर आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील पहिल्या काँक्रीट महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव एमएसआरडीसीने सरकारकडे पाठवला आहे.एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर एका वर्षात विस्तारीकरणाचे काम सुरू असून महामार्गावर आणखी दोन लेन तयार करण्याचे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार आहे.

तस पाहिलं तर हा 94.5 किमी लांबीचा महामार्ग 2002 मध्ये बांधण्यात आला होता. त्यामुळे पुणे – मुंबई प्रवास अवघ्या तीन ते चार तासांत पूर्ण करता येणार आहे. येथून दररोज 1.55 लाख वाहनांची ये – जा असते.  (Mumbai-Pune Expressway)

अंतर कमी करण्याचे कामही सुरू..

एक्स्प्रेस – वेचे अंतर कमी करण्यासाठी खोपोली एक्झिटजवळ पर्यायी मार्गही तयार करण्यात येत आहे. मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील अंतर 6 किमीपर्यंत कमी होणार आहे. एक्स्प्रेस – वेवरून प्रवास करणाऱ्या चालकांचा सुमारे 20 ते 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. सध्या महामार्गाचे खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटचे अंतर 19 किमी आहे. आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर 19 कि.मी. अंतर कमी होऊन 13.3 किमीपर्यंत कमी होईल. एमएसआरडीसी या मार्गावर दोन बोगदे, 2 डेकद्वारे आणि 8 लेन तयार करणार आहे..

कसा असणार भविष्यतला पुणे – मुंबई एक्सप्रेस – वे..

मुंबई ते नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी शिवडी – न्हावासेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (MTHL) तयार करण्यात येत आहे. 22 किमी.लांब असणारा हा पूल दक्षिण मुंबई ते रायगड जिल्ह्यातील चिर्लेपर्यंत बांधण्यात येणार आहे.

MTHL सोबतच मुंबई ते पुणे या वाहनांना सिग्नल – फ्री मार्ग उपलब्ध करून देण्याची योजनाही सरकारने तयार केली आहे. सरकार सुमारे 4.5 किमी. लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉरही बांधला जाणार आहे.

हा कॉरिडॉर MTHL आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वेला जोडेल. ते चिर्ले इंटरचेंज ऑफ एलिव्हेटेड रोड (MTHL) आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दरम्यान असेल.

एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर शिवडीमार्गे मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर सहज प्रवेश होईल. वाहने वेगाने आणि कमी वेळेत पोहोचू शकणार असून हा प्रवास फक्त 90 मिनिटांत पूर्ण होईल.

कमी वेळेत जास्त वाहने आल्याने महामार्गावरील वाहतुकीची समस्या अनेक पटींनी वाढणार आहे. हे लक्षात घेऊन सध्याच्या महामार्गावरील लेनची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *