जवळपास चार वर्षांपासून रखडलेल्या मुंबईतील दुसऱ्या सी – लिंकच्या कामाला आता वेग आला आहे. सी – लिंक बांधण्याचे काम नवीन कंत्राटदाराला मिळाल्यानंतर वांद्रे-वर्सोवा सी-लिंक समुद्रात आकार घेऊ लागला आहे. वांद्रे – वर्सोवा सी – लिंकचे काम 2018 पासून सुरू आहे.

जुन्या कंत्राटदाराच्या कामाच्या संथ गतीमुळे 2022 च्या मध्यापर्यंत केवळ 2 टक्के काम होऊ शकले. अशा परिस्थितीत मुंबईच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी सी – लिंक तयार करण्याची जबाबदारी दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आली. 17 किलोमीटर लांबीच्या सी – लिंकचे बांधकाम नवीन कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू केले होते. जुन्या कंपनीने चार वर्षांत केलेल्या कामाच्या तिप्पट काम नव्या कंपनीने सहा महिन्यांत पूर्ण केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, वांद्रे – वर्सोवा सी – लिंकचे काम 7 टक्के पूर्ण झालं आहे.

कामाचा वेग वाढवण्यासाठी वांद्रे, जुहूसह अन्य ठिकाणी काम सुरू झाले आहे. या ठिकाणी पिलर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पाण्याखाली पिलर तयार करणे आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी तात्पुरता पूल तयार करण्याचे कामही सुरू आहे. तो तयार होताच समुद्राच्या आत पिलर तयार करण्याच्या कामाचा वेग अनेक पटींनी वाढणार आहे.

वेळेची बचत होणार..

MSRDC ने सी – लिंक कन्स्ट्रक्शन कंपनीला दुसऱ्या कास्टिंग यार्डसाठी जमीन दिली आहे. वांद्रे रेक्लेमेशन जवळील कास्टिंग यार्डचे स्थान बांधकाम जागेच्या जवळ आहे. यामुळे उपकरणांना कामाच्या ठिकाणी सहज शक्य होणार आहे. मालाडमध्ये LINK चे कास्टिंग यार्ड आहे.

2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित..

सी – लिंकचे बांधकाम एका भारतीय कंपनीला देण्यात आले होते. ही कंपनी इटालियन कंपनीच्या सहकार्याने प्रकल्प पूर्ण करणार होती. काम करू न शकल्याने भारतीय कंपनीने आपले शेअर्स इटालियन कंपनीला दिले. उर्वरित काम दुसऱ्या भारतीय कंपनीसोबत इटालियन कंपनी पूर्ण करणार आहे. हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

फक्त 20 मिनिटांत पूर्ण होणार प्रवास..

पूल बांधल्यावर दीड ते दोन तासांऐवजी 20 – 25 मिनिटांत वांद्रेहून वर्सोव्याला पोहोचणे शक्य होणार आहे. या लिंकच्या बांधकामासाठी एकूण 11 हजार 332 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

तिसर्‍या सी – लिंकचे कामही लवकरच..

वर्सोवा ते विरार दरम्यानच्या तिसऱ्या सी – लिंकचे काम लवकरच सुरू होणार आहे. पुढील महिन्यापासून येथे जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन सर्व्हेचे काम सुरू होणार आहे. पहिल्या वांद्रे – वरळी सी – लिंकचे काम 2014 मध्ये पूर्ण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *