केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राप्रमाणेच शेतकऱ्यांना 3 टप्प्यात 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच दोन्ही योजनेचे मिळून वर्षाकाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 12 हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे.
शेतकरी सन्मान योजनेचा 13 वा हप्ता मागील महिन्यात शेतकऱ्यांना मिळाला होता, तर आता जून किंवा जुलै महिन्यात 14 वा हप्ता दिला जाणार असून, याचवेळी राज्य सरकार सुद्धा दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा करणार आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत.
त्यामुळे केंद्र व राज्याचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 हजार रुपये जमा होणार असून राज्यातील तब्बल 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे.
13 वा हप्त्याप्रमाणेच मिळणार 14 वा हप्ता..
13 व्या हप्त्याच्या लाभार्थ्याप्रमाणेच मिळणार आहे. पीएम किसान योजनेचा लाभ काही आयकर भरणारे, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यांच्याकडून लाभ घेतलेली रक्कम परत वसूल करण्याचे आदेश होते. त्याप्रमाणे त्यांची वसुली अद्यापही सुरूच आहे. संबंधित शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी तहसीलदारांच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता एकाच वेळी जमा करण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू आहेत. त्यामुळे मे किंवा जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी चार हजार रुपये जमा होण्याचे संकेत आहेत.
गावातच होतंय बँक खात्याशी आधार लिंकिंग..
14 व्या हप्त्यासाठी राज्यपातळीवर हालचाली सुरु असून आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे आयपीपीबी मार्फत 01 ते 15 मे या कालावधीत यासाठी गाव पातळीवर आधार लिंकिंगसाठी सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे.
आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहान करण्यात येत आहे. कृषी आयुक्त तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख सुनिल चव्हाण यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
Pm Kisan Beneficiary Status Check कसे कराल ?
पीएम किसान स्थिती तपासण्यासाठी, शेतकऱ्यांना त्याच्या अधिकृत वेबसाइट पीएम किसानच्या होम पेजला भेट देऊन BeneficiaryStatus चा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये शेतकरी Registration Number / Mobile Number टाकेल आणि Get Data बटणावर क्लिक करेल.
टीप – कॅप्चा मधील पर्यायावर उजवे क्लिक करून, नवीन टॅबमध्ये उघडा आणि तो कॅप्चा कोड प्रविष्ट करून, तुम्ही लाभार्थी स्थिती पाहू शकता.
आता पीएम किसान सन्मान निधी योजनेची स्थिती तुमच्या समोर दिसेल. जर पेमेंट प्रोसेस्ड, FTO, RFT Generated आणि – देखील हप्त्यात दिसत असेल, तर तुमच्या पेमेंटला 14 व्या हप्त्याची रक्कम मिळेल.
परंतु सर्व लाभार्थ्यांना सूचित केले जाते की, खाली दिलेली पीएम किसान स्थिती तपासताना या सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासा..
Aadhar Demo Authentication Status :- Sucess असणे आवश्यक आहे
KYC Done :- Yes असावे
Active / Inactive : Active असणे आवश्यक आहे
Eligibility :- Yes असणे आवश्यक आहे
Payment Mode:- Aadhar आधार दिल्यानंतर पैसे येतील
PFMS Bank Status :- Farmer Record Has been Accepted by PFMS / Bank असं असायला हवं.
Land Seeding:- Yes असावे.