national bamboo mission : बांबूच्या लागवडीतून हेक्टरी मिळवा 7 लाखांचा नफा !

0

सध्या भारतातील शेतकरी पारंपरिक शेती सोडून व्यावसायिक शेतीकडे वाटचाल करताना दिसून येत असून व्यावसायिक शेतीतून ते कमी वेळात अधिक कमाई करताना दिसून येत आहे. (national bamboo mission)

आज आपण अशाच एका शेती बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे शेतकरी करोडपती होऊ शकता. होय, बांबूची शेती ही अशी शेती आहे एकदाच लागवड करून ज्यातून शेतकरी केवळ 20 वर्षांच्या कालावधीत एक कोटी रुपयांहून अधिक कमाई करू शकतात..

बांबू लागवड अशी आहे की, शेतकऱ्याला दरवर्षी खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादींवर खर्च करावा लागत नाही. बांबूची लागवड करून शेतकरी वर्षाला हेक्टरी 7 लाख रुपये नफा मिळू शकतो. त्याचप्रमाणे तो अवघ्या 15 वर्षांत एक कोटी रुपयांहून अधिक कमवू शकतो.

आनंदाची बाब म्हणजे अलीकडेच केंद्र सरकारने राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत बांबू लागवडीला प्रोत्साहन दिलं असून 50 ते 90% पर्यंत अनुदानही देत आहे. शेतीशिवारच्या माध्यमातून या पोस्टमध्ये बांबूच्या शेतीतून करोडपती बनण्याविषयी संपूर्ण माहिती जाऊन घेणार आहोत त्यामुळे तुम्ही ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

राष्ट्रीय बांबू मिशन : एक हेक्टरमध्ये लागवड करा अन् मिळवा 7 लाखांचा नफा…

देशात बांबूच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत केंद्र सरकार 2014 पासून सातत्याने काम करत आहे. केंद्र सरकारने बांबूला झाडांच्या श्रेणीतून काढून टाकलं आहे. आता कोणीही बांबूची लागवड करू शकतो आणि त्याचे उत्पादन विकत घेऊ शकतो.

राष्ट्रीय बांबू मिशन अभियानांतर्गत बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी बांबूचे रोपटे मोफत आणि अनुदानावर दिलं जातं. देशात 13.96 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बांबू आहे. जगात बांबूच्या सुमारे 136 प्रजाती आहेत तर भारतात 10 प्रमुख प्रजातींची व्यावसायिक लागवड केली जाते. बांबू उत्पादनात भारत हे आघाडीचे राज्य आहे, तरीही निर्यात खूपच कमी आहे. बांबूची लागवड करून शेतकरी करोडपती बनू शकतात. पारंपारिक शेतीत खते, बियाणे, कीटकनाशके, सिंचन आणि मानवी श्रम प्रत्येक पिकावर भरपूर पैसा खर्च होतो, तर बांबूच्या शेतीत या सर्वांची गरज नसते. एक हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करून एक शेतकरी वर्षाला 7 लाख रुपये कमवू शकतो. (national bamboo mission)

राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत अनुदान :-

राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत शेतकऱ्यांना बांबू शेतीवर विविध प्रकारे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नॅशनल बांबू मिशन अंतर्गत एका आकड्यानुसार, 3 वर्षांमध्ये प्रति रोपाची सरासरी किंमत ₹ 240 आहे ज्या अंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति रोप 120 रुपये अनुदान म्हणून दिलं जातं.

पंतप्रधानांच्या राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी करण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या नोडल ऑफिसरकडून योजनेशी संबंधित अधिक माहिती देखील मिळवू शकता….

बांबू लागवडीसाठी आवश्यक गोष्टी :-

जर तुम्हाला बांबूची लागवड करायची असेल तर सर्वप्रथम तुमच्या शेतातील माती तपासून घ्यावी. 6.5 ते 7.5 पीएम मूल्य असलेली चिकणमाती माती बांबू लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते.

बांबू लागवडीचा उत्तम हंगाम म्हणजे मार्च महिना. बांबू लागवडीत सर्वप्रथम रोपवाटिका तयार करून त्यामध्ये रोपांची लागवड केली जाते. रोपे लावण्यासाठी वाफ्यात खोल पेरणी करावी लागते. पेरणीच्या पहिल्या आठवड्यात रोपे बाहेर येतात. झाडे थोडी मोठी झाल्यावर त्यांची पुनर्लावणी करावी.

जर तुम्हाला अपारंपारिक पद्धतीने बांबू वाढवायचा असेल, तर तुम्ही रूट कटिंग, कलम कटिंग कटिंग किंवा फांद्या कापणे या पद्धतींचा अवलंब करू शकता.

बांबूच्या लागवडीसाठी कोणत्याही खतांची किंवा कीटकनाशकांची गरज नसते.

बांबू वनस्पती जमीन संवर्धनाचे काम करते आणि मातीची धूप देखील रोखते.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही बांबू फायदेशीर आहे. ते कार्बन डायऑक्साइड घेते आणि ऑक्सिजन सोडते.

बांबू शेती व्यवसाय : शेतकरी बांबूच्या लागवडीतून मोठी कमाई करतील…

बांबूच्या लागवडीतून शेतकरी सतत नफा मिळवू शकतात. त्याची लागवड करून पारंपारिक पिकांपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. एका हेक्टर जमिनीत 4 ते 4 मीटर अंतरावर 625 रोपांची लागवड करून शेतकरी 5 व्या वर्षी 3125 बांबू मिळवू शकतो.

बांबूच्या उत्पादनात सातत्याने वाढ होत राहणार असून 8 व्या वर्षी शेतकऱ्याला 6250 बांबूचे उत्पादन मिळतं. हे बांबू बाजारात विकून शेतकरी हेक्टरी 5 ते 7 लाख रुपये कमवू शकतो. बांबूच्या शेतातील इतर शेती पिकांमधूनही शेतकरी कमाई करू शकतो. बांबूसह पांढरी मुसळी, आले, हळद इत्यादी पिकांची लागवड करून शेतकरी बांधव अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. बांबूचे रोप एकदा लावले की 40 ते 48 वर्षे उत्पादन देतं.

राष्ट्रीय बांबू मिशनसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा (how to apply for national bamboo mission) :-

सर्वप्रथम, तुम्ही राष्ट्रीय बांबू मिशनची अधिकृत वेबसाइट nbm.nic.in वर जा…

वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला वरच्या बाजूला शेतकरी नोंदणीची लिंक दिसेल.

तुम्हाला शेतकरी नोंदणीच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. क्लिक केल्यावर, खाली दर्शविल्याप्रमाणे नोंदणी पृष्ठ तुमच्या समोर उघडेल.

नोंदणी फॉर्ममध्ये, तुम्हाला तुमची माहिती प्रविष्ट करावी लागेल, प्रथम तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल, नंतर तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि तहसील निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडावे लागेल.

आता तुम्हाला आर्थिक वर्षाचा तपशील टाकावा लागेल, शेतकऱ्याचे नाव टाकावे लागेल आणि काही माहिती टाकावी लागेल.

आधार कार्ड आणि बँक खाते लिंक्ड असा ऑप्शन दिसेल, जर तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्ही ते दुरुस्त करून सबमिट करा.

फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमची नोंदणी राष्ट्रीय बांबू अभियानांतर्गत झाली आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित अधिकारी किंवा नोडल ऑफिसरशी देखील संपर्क साधू शकता…

राज्यातील बांबू शेती अनुदान पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा  

जर तुम्हाला बांबूचे रोपे खरेदी करायचे असतील तर तुम्ही https://dir.indiamart.com/pune/bamboo-plants.html वरून खरेदी करू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.