Navi Mumbai Metro : बेलापूर ते पेंढार मेट्रोची प्रतीक्षा संपली ! नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा, पहा तिकीट दर, स्टेशन्स अन् Route Map..

0

बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. नवरात्रीच्या दिवशी नारी शक्ती सन्मान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन होणार आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली खारघरमध्ये बैठक झाली. मात्र, उद्घाटन सोहळा कोणत्या तारखेला होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नसल्याचं सांगण्यात येत आहे, त्यामुळे नवी मुंबई पोलीस, सिडको आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत 14 किंवा 15 ऑक्टोबरला उद्घाटन सोहळा होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत चार उन्नत मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये बेलापूर ते पेंढार या 11 कि.मी. पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी सज्ज झाला आहे. या मार्गाचे काम दोन टप्प्यात पूर्ण झाले आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2021 मध्ये CMIS प्रमाणपत्र मिळाले होते, परंतु विविध कारणांमुळे सेवा सुरू होऊ शकली नाही. दरम्यान, सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकादरम्यानचे अपूर्ण कामही आता पूर्ण झाले आहे.

21 जून रोजी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सिडकोला प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे बेलापूर ते पेंढारपर्यंत मेट्रो सेवा सुरू करता येणार आहे. सिडकोनेही याबाबत तयारी सुरू केली आहे..

आतापर्यंत 2954 कोटींचा झाला खर्च..

या प्रोजेक्टसाठी 3063 कोटी 63 लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, आतापर्यंत 2954 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी लोकेश चंद्र हे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक होते. सिडकोचे एमडी अनिल डिग्गीकर यांनी या मार्गावरील स्टेशन्सना भेट देऊन पाहणी केली आहे.

नवी मुंबई मेट्रो रूट मॅप पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

मेट्रोचे भाडे निश्चित, महा मेट्रो करणार संचालन..

नवी मुंबई मेट्रो चालवण्याची जबाबदारी महा मेट्रोकडे सोपवण्यात आली आहे. ठरलेल्या भाड्यानुसार 2 किलोमीटरसाठी 10 रुपये, 2 ते 4 किलोमीटरसाठी 15 रुपये असेल. त्यानंतर प्रति 2 किलोमीटर भाडे 5 रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 10 किमीच्या पुढे भाडे 40 रुपये असेल. बेलापूर ते पेंढार दरम्यानचे भाडे 40 रुपये आहे..

नवी मुंबई मेट्रो रूट..

लाइन – 1 : CBD बेलापूर – पेंढार

लांबी: 11.10 किमी
अंदाजे खर्च: रु. 3063.63 कोटी
प्रकार: एलिव्हेटेड
डेपो : तळोजा
स्टेशन्सची संख्या : 11

बेलापूर ते पेंढार (तळोजा जवळ) 11 किमी अंतरावर 11 थांबे आहेत. बेलापूर, सेक्टर – 7 बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11 खारघर, सेक्टर 14 खारघर, सेंट्रल पार्क, पेठापाडा, सेक्टर 34 खारघर, पंचानंद आणि पेंढार टर्मिनल ही स्टेशन्सची नावे आहेत..

Leave A Reply

Your email address will not be published.