न्यू जनरेशन Swift 35Kmpl मायलेजसह होणार लॉन्च ! 4 – व्हील ड्राइव्हसह किलर लूक, पहा फीचर्स अन् किंमत..

0

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये, मारुती सुझुकी, टाटा आणि ह्युंदाई सारख्या अनेक कंपन्यांच्या कार्स आहेत. परंतु, या सेगमेंटमध्ये एक लोकप्रिय आणि आवडते नाव आहे, ते म्हणजे मारुती स्विफ्ट (Maruti Suzuki Swift). मारुती सुझुकी स्विफ्ट ही प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमधील लोकप्रिय कार आहे..

कंपनी लवकरच या कारचे नवं व्हेरियंट बाजारात आणणार आहे. कंपनीने नवीन मारुती सुझुकी स्विफ्टचे डिझाईन अतिशय आकर्षक बनवले आहे आणि त्यात अनेक जबरदस्त फीचर्स देखील दिले आहेत. त्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे मायलेज, कंपनीचा दावा आहे की, ती सध्याच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व कार मायलेजच्या बाबतीत सर्वांची बोलती बंद करणार आहे.

पॉवरफुल इंजिनसह जबरदस्त मायलेज..

नवीन मारुती स्विफ्टच्या पॉवरट्रेनसाठी, कंपनीने 48V सेल्फ – चार्जिंग हायब्रिड टेक्नॉलॉजीसह न्यू 1.2L, 3 – सिलेंडर पेट्रोल इंजिन सादर केले आहे. हे इंजिन 82bhp पॉवर आणि 108Nm च्या पीक टॉर्कसह येते आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. गॅसोलीन इंजिन मॉडेलसह, त्याचे हायब्रिड व्हेरियंटही उपलब्ध आहे आणि कंपनीच्या मते, या कारचे पेट्रोल इंजिन 23.40 किमी / लीटर मायलेज देईल आणि हायब्रिड इंजिन 35 किमी / लीटर मायलेज देणार आहे.

न्यू मारुती स्विफ्टचे फीचर्स..

नवीन मारुती स्विफ्टमध्ये तुम्हाला अनेक नवे आणि ॲडव्हान्स फीचर्स मिळतील. यामध्ये वायरलेस ॲपल कारप्ले आणि ॲड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणारी 9-इंच फ्री – स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, वाहनाला सेमी – डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एक स्टायलिश डिझाइन केलेले मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील आणि न्यू HVAC कंट्रोल मिळतात. याशिवाय, टोकियो मोटर शोमध्ये प्रदर्शित केलेल्या स्विफ्टमध्ये ADAS (ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) फीचर्स देखील आहेत, जी गाडीची सेफ्टी आणि ड्रायव्हिंग अनुभव सुधारण्यात मदत करतात..

किलर लूकसह होणार लॉन्च..

नवीन लूक आणण्यासाठी न्यू स्विफ्टचे हेडलॅम्प अतिशय शार्प लूकसह येणार आहे. वाहनाचे नवीन फ्रंट डिझाईन देखील आकर्षक आहे, ज्यामध्ये बिग साईझची ग्रीलचा समावेश आहे. न्यू क्लॅमशेल बोनेट, रुंद बॉटम स्टॅन्स, शोल्डर लाइन, ट्रेडिशनल डोअर हँडल्स, रॅपराऊंड इफेक्ट ग्लासहाऊस, ब्लॅक्ड-आउट सी – पिलर, स्क्वेअर टेलगेट आणि ड्युअल – टोन रिअर बम्पर – या सर्वांचा नव्या स्विफ्टमध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त, ती आता पूर्वीपेक्षा 15 मिमी लांब, 30 मिमी हाय आणि 40 मिमी रुंद आहे.

न्यू मारुती सुझुकी स्विफ्टची किती असणार किंमत..

मारुती स्विफ्ट 2024, जी हायब्रिड सेगमेंटमध्ये येते, मारुती कंपनी सुमारे 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या बजेटमध्ये लॉन्च करू शकते. कारण त्यात पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक सुविधांचा समावेश अपेक्षित आहे. हायब्रिड आणि नॉन – हायब्रीड व्हर्जनच्या किमतीत 2 – 2.5 लाख रुपयांचा फरक असू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.