लॉन्च होताच Maruti ची ही Car ठरली सुपरहिट ; 3 चं दिवसांत मिळाल्या 46,000 बुकिंग, वेटिंग पिरियड ही वाढला, पहा किंमत…

0

शेतीशिवार टीम, 4 जुलै 2022 : नवीन मारुती ब्रेझा (Brezza) नुकतीच भारतात लॉन्च करण्यात आली आहे. त्याच्या एंट्री-लेव्हल LXi मॅन्युअल मॉडेलची किंमत 7.99 लाख रुपये आहे आणि रेंज-टॉपिंग ZXi ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत 13.96 लाख रुपये ( Ex-showroom)) आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

कंपनीला या नवीन SUV वर आतापर्यंत 46,000 बुकिंग मिळालं आहे. मारुती सुझुकीच्या वरिष्ठ अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, नवीन 2022 मारुती ब्रेझाचा वेटिंग पिरीयड सुमारे साडेचार महिन्यांचा असणार आहे. कंपनी वेटिंग पिरीयड कमी करण्यासाठी प्रॉडक्शन वाढवत आहे.

नवीन Brezza 4 ट्रिममध्ये येते – LXi, VXi, ZXi आणि ZXi+ – जे अगदी नवीन 15L K15C पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. 5-स्पीड मॅन्युअल आणि 6 – स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेली गॅसोलीन मोटर 103bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क वितरीत करते.

SUV चे मायलेज मॅन्युअल सह 20.15kmpl आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटसह 19.80kmpl आहे. कार निर्मात्याने पुष्टी केली आहे की, येत्या काही महिन्यांत Brezza CNG लाँच केली जाणार आहे.

या सेगमेंटमध्ये प्रथम मिळालाय हेडअप डिस्प्ले :-

हेड-अप डिस्प्ले देणारी Brezza ही त्या सेगमेंटमधील पहिली कॉम्पॅक्ट SUV बनली आहे. ही स्क्रीन ड्रायव्हरच्या समोरील डॅशबोर्डवर फिक्स केलेली असते. डॅशबोर्डवर हेडअप डिस्प्ले स्क्रीन ही डाऊन राहती जशी आपण कार स्टार्ट करू तशी ती आपोआपच उघडते.

या स्क्रीनचे खास फीचर्स म्हणजे यामुळे ड्रायव्हरला नेव्हिगेशन सोपं होणार आहे. म्हणजेच डायरेक्शन एरो या स्क्रीनवर आपोआपच येतील ज्यामुळे चालकाला समोर पाहून सहज वाहन चालवता येतं. म्हणजेच, आता ते इन्फोटेनमेंट स्क्रीनवर पाहण्याची गरज भासणार नाही…

Brezza मध्ये मिळणार 360 डिग्री कॅमेरा :-

ऑल-न्यू Hot Brezza मध्ये Baleno प्रमाणेच 360-डिग्री कॅमेरा आहे. हा कॅमेरा हाईटेक आणि मल्टी इन्फॉर्मेशन देणारा कॅमेरा आहे. हा कॅमेरा कारच्या 9-इंचाच्या स्मार्टप्ले प्रो प्लस टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमशी जोडला गेला आहे. या सिस्टीमला सुझुकी आणि टोयोटा या दोघांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. ही इन्फोटेनमेंट सिस्टम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेला सपोर्ट करते. या कॅमेऱ्याची खास गोष्ट म्हणजे कारच्या आत बसून तुम्हाला कारच्या आजूबाजूचे दृश्य स्क्रीनवर पाहता येतं. यामुळे कार पार्क करणे किंवा रिव्हर्स करणे सोपं होतं.

चार्जिंगसाठी मिळणार वायरलेस डॉक :- 

कारमध्ये प्रथमच वायरलेस चार्जिंग डॉक देखील देण्यात आला आहे. या डॉकच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन वायरलेस पद्धतीने चार्ज करू शकाल. हे फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर अतिउष्णता टाळण्यासाठी त्यामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे. यात मारुतीचे अनेक कनेक्टिंग फीचर्स देखील मिळतील. जे या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला अतिशय शानदार आणि ऍडव्हान्स बनवते.

Leave A Reply

Your email address will not be published.