Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : किसान क्रांती पॅनलची बहुमताच्या दिशेने वाटचाल ; तर सोसायटी मतदारसंघातही राजेंद्र नागवडे विजयी

शेतीशिवार टीम, 15 जानेवारी 2022 : श्रीगोंदा गटाच्या विजयानंतर नागवडे कारखान्याच्या 12 जागांवर राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनलने विजय मिळवत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे.

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी प्रक्रिया अजूनही सुरु असून बेलवंडी, टाकळी कडेवळीत, लिंपणगाव व श्रीगोंदा गटातही किसान क्रांती पॅनलने विजय मिळवला आहे.

श्रीगोंदा गट :-

नागवडे गट :-

सुभाष आनंदराव शिंदे – 9970 (विजयी)
बाबासाहेब सहादू भोस 9874 (विजयी)

पाचपुते – मगर गट :-

जिजाबापू पर्वती शिंदे – 6888 (पराभूत)
बापूसाहेब शामराव भोस – 6349 (पराभूत)

तर सोसायटी मतदारसंघात किसान क्रांती पॅनलचे प्रमुख राजेंद्र शिवाजीराव नागवडे 25 मते – विजयी ) यांनी विजय मिळवला. तर सहकार पॅनलचे प्रविणकुमार बन्सीलाल नाहाटा (16 मते – पराभव ) यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

सोसायटी मतदार संघ :-

मतदार – 41

राजेंद्र नागवडे – 25

बाळासाहेब नहाटा -16

योगेश मगर – 00

सध्या नागवडे कारखान्याच्या चार सर्वसाधारण गटासह सोसायटी मतदार संघ अशा 12 जागांची मतमोजणी पूर्ण झाली असून सध्या काष्टी गटाची मतमोजणी सुरू असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.