Take a fresh look at your lifestyle.

नगर-पुणे महामार्गावरून प्रवास करणार असाल तर ही बातमी अत्यंत महत्वाची…

शेतीशिवार टीम, 29 डिसेंबर 2021: भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या कार्यक्रमासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. व नगर-पुणे महामार्गावरील परिपत्रक काढण्यात आलं असून वाहतुकीत मोठे बदल केले आहे.

पोलिसांच्या आदेशानुसार पुणे आणि मुंबईहून नगरकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीत 29 तासांसाठी हे बदल करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या भीमा कोरेगावात येण्यास नागरिकांवर निर्बंध लादण्यात आले होते. यावर्षी निर्बंध काहीसे शिथील असल्याने पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आलेले असले तरी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भीमा कोरेगावात दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र, यामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे ती अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. यासाठी मोठा पोलिस बंदोस्तही तैनात करण्यात आला आहे.

पुण्याहून नगरकडे जाणारी वाहतूक खराडी बायपास- केडगाव – चौफुली – न्हवरा – शिरूरमार्गे नगरकडे अशी असेल. तसेच,नगरहून पुण्याकडे जाताना याच मार्गे वाहने जातील.

मुंबईहून नगरकडे येणारी जड वाहतूक वडगाव मावळ – चाकण – खेड – मंचर – नारायणगाव- आळेफाटा – नगर. नगरहून मुंबईकडे जाणाऱ्यांनाही याच रस्त्याने जावे लागेल.

मुंबईहून नगरकडे जाणारी इतर वाहने चाकण – खेड – पाबळ – शिरूरमार्गे नगरकडे.

सोलापूरहून चाकणकडे जाणारी वाहतूक खराडी बायपास- विश्रांतवाडी – आळंदीमार्गे चाकण