Take a fresh look at your lifestyle.

Toyota ची फॉर्च्युनर, इनोव्हा, Glanza नाही तर, ‘या’ SUV ने लोकांना लावलं वेड ; महिनाभरात झाली रेकॉर्डब्रेक वाढ, पहा डिटेल्स…

टोयोटा किर्लोस्कर मोटर्ससाठी जुलै- 2022 हे एक उत्तम वर्ष ठरलं आहे. गेल्या महिन्यात कंपनीला वार्षिक 50% वाढ मिळाली. जुलै 2021 मध्ये, कंपनीने भारतीय बाजारात 13,098 युनिट्सची विक्री केली. तर, जुलै 2022 मध्ये 19,693 युनिट्सची विक्री झाली. म्हणजेच, कंपनीने 6595 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली. तसेच कंपनीच्या मासिक विक्रीत 19.26% वाढ झाली आहे.

विशेष बाब म्हणजे भारतात सर्वात शक्तिशाली SUV विकणाऱ्या टोयोटाने कॉम्पॅक्ट एसयूव्हीमुळे हे स्थान मिळवलं. अर्बन क्रूझर (Urban Cruiser) ही कंपनीसाठी ट्रम्प कार्ड ठरली. ही कॉम्पॅक्ट SUV मारुतीच्या Vitara Brezza च्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. अर्बन क्रूझरने 174.67% ची वार्षिक वाढ पोस्ट केली.

डिमांडमध्ये इनोव्हा क्रिस्टा आणि ग्रोथमध्ये अर्बन क्रूजर चा दबदबा :-

Toyota साठी सर्वाधिक विक्री होणारी कार इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) होती. कंपनीने गेल्या महिन्यात या MPV च्या 6900 युनिट्सची विक्री केली. जुलै 2021 च्या तुलनेत त्यात 13.24% वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी 6093 इनोव्हा क्रिस्टा विकल्या होत्या. म्हणजेच गेल्या महिन्यात त्यांनी या MPV च्या 804 हून अधिक युनिट्सची विक्री केली.

परंतु, वाढीच्या बाबतीत, अर्बन क्रूझरने (Urban Cruiser) टोयोटाच्या सर्व वाहनांना मागे टाकले. कंपनीने गेल्या महिन्यात आपल्या 6742 युनिट्सची विक्री केली. जुलै 2021 मध्ये त्याची 2448 युनिट्सची विक्री झाली होती . म्हणजेच, कंपनीने 174.67% वार्षिक वाढीसह अर्बन क्रूझरच्या 4276 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री केली. टोयोटाची मोस्ट पॉपुलर SUV फॉर्च्युनरने 67.69% वार्षिक वाढ, Glanza 12.29% वार्षिक वाढ आणि Vellfire 41.94% वार्षिक वाढ झाली.

आता अर्बन क्रूझर बनली हायरायडर (Hyryder) :-

Toyota ने गेल्या महिन्यात अर्बन क्रूझर हायराइडर मिड – साइड SUV लाँच केली होती. Hyryder ही सुझुकीच्या आर्किटेक्चरवर बनवली आहे. हे सेल्फ चार्जिंग हायब्रिड टेक्नॉलॉजिसह लॉन्च केली आहे. कर्नाटकातील बेंगळुरूजवळील बिदाडी येथील टोयोटाच्या कारखान्यात ऑगस्टपासून या नव्या अर्बन क्रूझर एसयूव्हीचे प्रॉडक्शन सुरू झालं आहे. कंपनीने त्याचे बुकिंगही सुरू केलं आहे. ग्राहक 25,000 रुपये भरून ते बुक करू शकतात…

1.5-लिटर माइल्ड – हायब्रिड पेट्रोल इंजिन :-

Toyota च्या अर्बन क्रूझर हायरायडरला (Hyryder) सेगमेंटचे पहिले माइल्ड – हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळेल. माइल्ड – हायब्रीड व्हेरियंटमध्ये ऑल-व्हील-ड्राइव्ह मिळवणारे हे सेगमेंटचे पहिलं मॉडेल आहे. हाय रायडर 1.5-लिटर इंजिनद्वारे समर्थित आहे. जे e-drive ट्रान्समिशनशी जुळते. त्याचे इंजिन आउटपुट 68 kW आहे आणि ते 122Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास कॅपेबल आहे. त्याची मोटर आउटपुट 59 kW ची पॉवर आणि 141Nm टॉर्क जनरेट करू शकते. दोन्ही मोटर्स मिळून 85 kW चे आउटपुट निर्माण करण्यास कॅपेबल आहेत.

टोयोटा हायरायडरचे अँक्सटीरियर :-

टोयोटाच्या या कॉम्पॅक्ट SUV च्या अँक्सटीरियर बद्दल बोलायचं झाल्यास, याला ड्युअल-टोन कलर देण्यात आला आहे. म्हणजेच, तुम्ही तो रेड + ब्लॅक किंवा ब्ल्यू + ब्लॅक कॉम्बिनेशन सह खरेदी करू शकता. याला एक मोठा बोनेट, क्रोम स्ट्रिप, स्प्लिट LED DRLs आणि एक मोठा एअर डॅम मिळतो. रॅपराउंड टेल लॅम्प बँक साईडला देण्यात आला आहे.SUV मध्ये अगदी नवीन डिझाइन केलेले ड्युअल-टोन अलॉय व्हील आहेत. हे नॉर्मल अर्बन क्रूझरपेक्षा जास्त लांब आहे.

टोयोटा हायरायडरचे (Hyryder) इंटीरियर :-

गाडीच्या इंटीरियरबद्दल बोलायचं झालं तर याला ड्युअल-टोन फिनिश मिळेल. डॅशबोर्डवर सॉफ्ट-टच लेदर दिलं आहे. या मध्यम आकाराच्या SUV मध्ये तुम्हाला फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, HUD आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय रियर एसी व्हेंट्स, क्लायमेट कंट्रोल, वायरलेस अँपल कारप्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह अँड्रॉइड ऑटो, पॉवर ड्रायव्हर सीट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि 360-डिग्री कॅमेरा सारखे जबरदस्त फीचर्सही देण्यात आले आहे.

टोयोटा Hyryder चे सेफ्टी फीचर्स :-

Toyota Urban Cruiser Highrider ला 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड आणि हिल स्टार्ट असिस्ट मिळतील. याशिवाय 360-डिग्री कॅमेरे, फ्रंट आणि बॅक साईडला पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, दोन्ही रोव्हसाठी थ्री-पॉइंट सीट बेल्ट आणि अँडजस्टेबल हेडरेस्ट सारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत. असे सेम फीचर्स न्यू ब्रेझामध्येही देण्यात आली आहेत.