Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : CDS बिपीन रावत यांच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेचं काय होतं कारण ? मोठी माहिती समोर

शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : 8 डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 जणांचा मृत्यू झाल्याच्या एका महिन्यानंतर या संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

या घटनेच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. या समितीच्या सूत्रांकडून हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल माहिती दिली आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने अपघातासाठी जबाबदार असलेल्या संभाव्य मानवी चुकांसह सर्व संभाव्य पैलूंची छाननी केली असता या दुर्घटनेमागील कारण समजलं.

कमिटीने अहवालात म्हटले आहे, की खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला ‘Controlled Flight Into Terrain’ (CFIT) असे म्हणतात. आता हा अहवाल कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदा विभागाकडे पाठविण्यात आला असून, लवकरच तो वायुसेना प्रमुखांकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते..

याबाबत NDTV च्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 अधिकाऱ्यांच्या अपघाताची चौकशी जवळपास पूर्ण झाली आहे आणि ती लवकरच सादर करण्यात येणार आहे.

या बाबत सध्या हवाई दल किंवा सरकारने तपास किंवा अहवालावर कोणतेही वक्तव्य दिलेले नसलं तरी, सूत्रांचे म्हणणं आहे की, अपघाताचं कारण खराब हवामान असू शकतं. परंतु यावर अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाहीये.