आजकाल अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी करून ऐशोआरामाचे जीवन जगायचे असते, पण काही लोक असेही असतात की, ज्यांना नोकरी न करता स्वतःचे काहीतरी करायचे असते, जेणेकरून त्यांच्या मनाला समाधान मिळते. सध्याच्या युगात, बहुतेक लोक एकतर स्वतःचे स्टार्टअप सुरू करत आहेत किंवा नोकरी न करता शेतीमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या आर्टिकलमध्ये, आजची यशोगाथा बिहारच्या पश्चिम चंपारण येथे राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितिल भारद्वाजची आहे, ज्याने आपली चांगली पगाराची नोकरी सोडून शेतीची निवड केली आणि आज त्याच शेतीच्या जोरावर दरवर्षी 30 लाख रुपये कमावतात. नितिलचे वडील शेतकरी आहेत.

मोत्यांच्या शेतीची कल्पना कशी सुचली ?

नितिल सांगतो की, 2017 मध्ये तो शहरातून गावात आला तेव्हा एके दिवशी त्याच्या वडिलांना वृत्तपत्रातून मोत्यांच्या शेतीची माहिती मिळाली. शेतकरी असल्याने त्यांनी त्याबद्दल सविस्तर वाचले आणि नितिलला हि त्याच्याबद्दल सांगितले.नितिलला मोत्यांच्या शेतीची (Pearl Farming) कल्पना आवडली आणि त्याला वाटले की शेतीमध्ये काहीतरी वेगळे आणि युनिक करण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बस काय मग त्यांनी त्याबद्दल सविस्तर माहिती गोळा करायला सुरुवात केली.

मोती शेतीसाठी MP मधून घेतले प्रशिक्षण :-

मोत्यांच्या शेतीविषयी जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी एके दिवशी माहिती मिळाली की, त्याच्या शेतीसाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे आणि मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे त्याच्या शेतीसोबत प्रशिक्षणही दिले जाते. त्यांना मोत्यांच्या शेतीचे खूप आकर्षण होते, म्हणून त्यानी सुट्टी घेतली आणि मध्य प्रदेशाला गेला. तिथे त्याला शेतीशी संबंधित सर्व गोष्टी जवळून समजल्या. याशिवाय अधिक समजून घेण्यासाठी त्यांनी काही दिवस तेथे काम केले. त्यानंतर मोत्यांची शेती आपण यशस्वीपणे करू शकतो अशी पूर्ण खात्री झाल्यावर तो गावी परतला.

नोकरी सोडून 25 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केली मोत्यांची शेती :-

नोकरी आणि शेती दोन्ही एकत्र करणं नितिल साठी खूप अवघड काम होतं. अशा स्थितीत त्यानी नोकरी सोडण्याचा कठीण निर्णय घेतला आणि 2019 मध्ये नोकरी सोडून तो शेती करण्यासाठी गावी आला. मोत्यांच्या शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी लागते, म्हणून त्यानी एक एकर जमिनीवर तलाव खोदला. मात्र, या कामासाठी त्यांना शासनाकडून 50% अनुदान मिळाले. त्यानंतर त्यांनी चेन्नईहून 500 टरफले / शिपले आणून तलावात लावली. यात त्यांचे 25 हजार रुपये खर्च झाले, मात्र मोती शेतीतून त्यांना पहिल्यांदाच 75 हजार रुपयांचा फायदा झाला.

पहिल्यांदाच चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी शेतीची व्याप्ती वाढवली. यावेळी त्यांनी 500 ऐवजी 25 हजार टरफले / शिपले खरेदी करून तलावात त्याची लागवड केली आणि दुप्पट कमाईसाठी मत्स्यपालनही सुरू केले…

मोत्याच्या शेतीसाठी आवश्यक गोष्टी :-

ज्या शेतकर्‍यांना मोत्यांची शेती करायची आहे, त्यांना ट्रेनिंग, तलाव आणि शिंपल्यांची गरज असल्याचे नितिल सांगतात. मात्र, तलाव खोदण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळतं, त्याचा लाभ शेतकऱ्यांना घेता येईल. देशातील अनेक राज्यांमध्ये शिंपले सहज उपलब्ध होत असले, तरी बिहार आणि दक्षिण भारतातील दरभंगा येथे मिळणाऱ्या शिपल्यांची क़्वालिटी खूप चांगली असते.

काही लोकांना असे वाटते की, ट्रेनिंग शिवायही त्याची लागवड करता येते, परंतु नितिल म्हणतात की, या शेतीमध्ये शिंपांची देखभाल, ट्रीटमेंट आणि ऑपरेशन यासारख्या गोष्टी फार आवश्यक आहे, ज्यासाठी ट्रेनिंग आवश्यक आहे. त्यामुळे चांगले उत्पादन व उत्पन्न मिळविण्यासाठी ट्रेनिंग घेऊनच मोत्यांची शेती सुरू करावी.

मोत्याची शेती करण्याची प्रक्रिया :-

नितिल सांगतात की, मोत्यांच्या शेतीसाठी प्रथम शिंपल्या जाळ्यात बांधल्या जातात आणि 10 ते 15 दिवस तलावात ठेवतात. त्यानंतर त्याला बाहेर काढले जाते आणि सर्जरी केली जाते. म्हणजेच, याच्या आतील भागात एक साचा घातला जातो कारण या साच्यावर कोटिंग केल्यावर, शिंप थर तयार करतात ज्याचे नंतर मोत्यांमध्ये रूपांतर होते.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, शिपल्यांवर वैद्यकीय उपचार केले जातात, त्यांना लहान बॉक्स मध्ये ठेवले जाते आणि दोरीच्या सहाय्याने पुन्हा तलावात टाकले जाते. त्यानंतर, सलग 15 दिवस त्याची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून मृत शिंपले तलावातून काढता येतील. या संपूर्ण प्रक्रियेनंतर सुमारे 10 महिन्यांनंतर मोती तयार होऊ लागतात. त्यानंतर शिंपल्यातून मोती काढला जातो.

खर्चाच्या चौपट कमाई :-

नितिल यांच्या म्हणण्यानुसार, एक शिपला तयार करण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो, तर एका शिंपल्यापासून दोन मोती तयार होतात आणि एका मोत्याची किंमत 120 रुपये आहे. याशिवाय, जर तुम्ही क़्वालिटी वर काम केले असेल, तर बाजारात त्याची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. अशा प्रकारे, जर तुम्ही 8 लाख रुपये किंमतीचे 25 हजार शिंपले ठेवले तर त्यापैकी 50% चांगले असतात. याद्वारे तुम्हाला 30 लाखांचे वार्षिक उत्पन्न सहज मिळू शकतं.

लॉकडाऊनमध्ये अनेकांना दिला रोजगार :-

मोत्याच्या शेतीसोबत ते याचे ट्रेनिंग देखील देतात. त्यांनी लॉकडाऊनमध्ये बेरोजगारांना मोती शेतीचे प्रशिक्षण देऊन रोजगाराशी जोडले आहे. सध्या त्यांच्यासोबत 6 लोक काम करतात, त्यांना यातून महिन्याला 10 ते 12 हजार रुपये मिळतात.

इंटिग्रेटेड फार्मिंग (Integrating Farming) च्या माध्यमातून तुम्ही दुप्पट कमाई करू शकता…

नितील मोत्यांवर प्रक्रिया करून अनेक उत्पादने तयार करून बाजारात जास्त किमतीने त्याची विक्री करतात. (Integrating Farming)साठी तलाव हा एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. तलावात मोत्यांची लागवड करण्याबरोबरच मत्स्यपालन, बदक पालन करून दुप्पट नफा कमावता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *