स्मार्टफोन विश्वात आगळा-वेगळा फोन लॉन्च। ट्रान्सपरन्ट लूक, दमदार फिचर्ससह ‘हा’ क्लासी स्मार्टफोन पाहून तुम्ही अवाक् व्हाल, पहा किंमत…

0

शेतीशिवार टीम : 15 जुलै 2022 :- भारतीय स्मार्टफोनच्या दुनियेत # Nothing नावाच्या नव्या कंपनीचा प्रवेश झाला आहे. सध्याच्या स्मार्टफोनच्या बाजारात तेच कलर, तोच लुक, तोच कॅमेरा सेटअप, सेम फिचर्स यामुळे बोर झालेल्या स्मार्टफोन विश्वात ही नविन कंपनी नक्कीच धुमाकूळ घालेल असं वाटतंय. त्याला कारण ही तसंच आहे. या कंपनीने त्यांचा # NothingPhone1 हा फोन लॉन्च केला आहे.

अप्रतिम Unique लुक आणि जबरदस्त फिचर्स सह हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोन सोबत तुम्हाला तीन वर्षांचे अपडेट देणार असल्याचं कंपनीने जाहीर केले असल्या कारणाने हा फोन Future Proof मानला जातो आहे.

कंपनी जरी नविन असली तरी कंपनीने Google सोबत पार्टनरशिप केलेली असुन देशात 850+ कस्टमर केअर सेंटर सुद्धा चालू केले आहेत. पहिला फोन कंपनी 32-35 हजारांच्या किंमतीत लॉन्च करत आहे. बघु आता ही कंपनी रेडमी, रिअलमी, वनप्लस, ओप्पो, विवो या कशी टक्कर देतेय…

NothingPhone1 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स अन् किंमत पाहूया…

लंडनबेस्ड कंपनी Nothing पहिला स्मार्टफोन ‘NothingPhone1’ अर्धपारदर्शक बॅक पॅनल आणि अनोख्या डिझाइनसह येतो. मागील पॅनलवर एलईडी स्ट्रिप्स आहेत, जे युजर्सला सूचना, रिंगटोनसह विविध कार्यांसाठी एक यूनिक लाइट पॅटर्न निवडण्याची परवानगी देतं.

हँडसेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55-इंचाचा OLED डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ चिप, 50-मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि 33W फास्ट चार्जिंगसह 4500mAh बॅटरी आहे.

किंमत :-

ज्यां ग्राहकांनी या फोन ची प्री-ऑर्डर केली आहे त्यांना हा फोन Rs 31,999 (8GB+128GB), Rs 34,999 (8GB+256GB) आणि Rs 37,999 (12GB+256GB) च्या माफक दरात मिळणार आहे. प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना कंपनी काही ऑफरही देत ​​आहे. ते HDFC ची 2,000 रुपयांची झटपट सवलत मिळवू शकतात जी 3 आणि 6 महिन्यांच्या EMI (क्रेडिट कार्ड (EMI आणि पूर्ण स्वाइप) आणि डेबिट कार्ड (EMI)) वर लागू आहे. बाजारात या स्मार्टफोनची विक्री 21 जुलैपासून सुरु होणार आहे.

Nothing Phone 1 च्या मोबाईलची खासियत :-

ड्युअल-सिम (नॅनो) नथिंग फोन 1 Android 12 वर चालतो आणि 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास सेफ्टीसह 6.55-इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सेल) OLED डिस्प्ले स्पोर्ट करतो. स्मार्टफोनच्या मागील बाजूस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील उपलब्ध आहे. इतर डिस्प्ले फीचर्समध्ये HDR10+ सपोर्ट, 402 ppi पिक्सेल डेन्सिटी आणि 1,200 निट्स पीक ब्राइटनेस यांचा समावेश आहे. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G+ चिपसह 12GB पर्यंत LPDDR5 रॅमसह जोडलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.