शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेततळ्यासाठी 3 लाख तर फळबागसाठी हेक्टरी 2 लाख रु. अनुदान ; 100 % अनुदानासह योजनेचे अर्ज झाले सुरु…

0

शेतीशिवार टीम : 17 सप्टेंबर 2022 :- शेतकऱ्यांसाठी ग्रामपंचायत -पंचायत समिती मार्फत 100 टक्के अनुदानावर राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या नवीन अर्जाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (Mahatma Gandhi NREGA) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड, बांधावरील वृक्ष लागवड सलग क्षेत्रावर वृक्ष लागवड, पडीक क्षेत्रावरील वृक्ष लागवड, फुलपिकांची लागवड, औषधी वनस्पतींची लागवड, नाडेप कंपोस्ट – वर्मी कंपोस्ट याचबरोबर 6000 हजारापासून 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान देणारे शेततळे अशा विविध योजना राबविल्या जातात. आणि याच योजनांकरता 2022 करता अर्ज करावेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

यापूर्वी शासनाच्या माध्यमातून 28 मार्च 2022 रोजी मनरेगाच्या संदर्भातील राजपत्रक काढून NREGA अंतर्गत अकुशल कामासाठी दिली जाणारी मजुरी ही 256 रुपये करण्यात आलेली आहे.

याचबरोबर 10 ऑगस्ट 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय काढून बांधावरील वृक्ष लागवड, फळबाग लागवड, सुगंधी वनस्पती, औषधी वनस्पती लागवड या सर्वांसाठी 256 रुपये मजुरी नुसार नवीन अंदाजपत्रक देण्यात आलं आहे.

काय आहे योजनेचे उद्दिष्टे :-

या योजनेअंतर्गत मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.

अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा.

अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती (विमुक्त जमाती), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे.

अर्जदाराला 0.05 हेक्टर ते – 2 हेक्टर पर्यंत जमिन असणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतीमध्ये जमा कारवायाचे आवश्यक कागदपत्रे :-

बैंक पासबुक
जॉब कार्ड
सातबारा उतारा 7/12
8 अ उतारा
आधारकार्ड

किती मिळेल अनुदान :-

फळबाग / फुलपिक लागवड :- प्रति हेक्टर – 2 लाख रुपये.
व्हर्मी कंपोष्ट :- प्रति युनिट – 11 हजार 944 रुपये
नाडेप कंपोष्ट :- प्रति युनिट – 10 हजार 537 रुपये
शेततळे :- 60 हजार ते 3 लाखापर्यंत (आकारमानानुसार)

या फळपिके, फुल पिकांसाठी मिळेल अनुदान :-

फळपिके / नारळ, बोर, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता, कडुलिंब, शेवगा, आंबा, काजू , चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, केळी, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खेर, ताड, सुरु, रबर, महारुख, मंजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार, शिरीष, बांबू ड्रॅगनफुट, करवंद, तुती, जड़ोफा, गिरीपुष्प, पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया व औषधी वनस्पती इत्यादी.

फुलपिके :- गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा

अनुदानातील अंतर्भुत बाबी :

जमीन तयार करणे
खड्डे तयार करणे
कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे
खते देणे
आंतरमशागत
पीक संरक्षण व पाणी देणे

या योजनांकरिता मिळालेले अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा केले जाते.

अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

मनरेगा अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड करा :- 

जॉबकार्ड कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना क्रमांक – 1 डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

काम मागणीचा अर्ज नमुना क्रमांक – 4 डाउनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक सामूहिक सिंचन विहीर मंजुरी अर्ज (PDF) डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा

सुधारित दरपत्रक पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

  

Leave A Reply

Your email address will not be published.