‘ही’ बनली देशातील No.1 इलेक्ट्रिक स्कुटर कंपनी ; महिनाभरात विकल्या तब्बल इतक्या स्कुटर ; पहा, जूनमधील टॉप 5 EV लिस्ट…

0

शेतीशिवार टीम :14 जुलै 2022 :- इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या बातम्यांदरम्यान, सरकारने नवीन बॅटरी मानके सेट करण्याचे आणि बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणण्याचे काम तीव्र केले आहे. दुसरीकडे, ओकिनावाने (Okinawa) पुन्हा एकदा विक्रीचा नवा विक्रम रचला असून कंपनी देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर विभागातील नंबर-1 कंपनी बनली आहे. जाणून घ्या, कशी होती ओला इलेक्ट्रिक, आणि इतर कंपन्यांची अवस्था…

जूनमध्ये Okinawa ने रेकॉर्डब्रेक स्कूटर विकल्या :- 

सरकारच्या VAHAN पोर्टलच्या आकडेवारीनुसार, जून 2022 मध्ये ओकिनावाच्या (Okinawa) इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 6,983 युनिट्सवर होती. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अँपिअर ब्रँड (Ampere Electric Scooters) आहे, ज्याने जूनमध्ये 6,541 स्कूटरची नोंदणी केली आहे. त्याच वेळी हिरो इलेक्ट्रिक तिसऱ्या क्रमांकावर होती, ज्याने 6,503 युनिट्सची विक्री केली.

Ola Scooter गेली चौथ्या क्रमांकावर…

आगीच्या घटना आणि ग्राहक सेवा समस्यांमुळे अलिकडच्या काही महिन्यांत ब्रँड इमेज म्हणून ओला इलेक्ट्रिकला (Ola Electric) मोठा फटका बसला आहे. यानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणावर फेरबदल झाले असून अनेक उच्चपदस्थांनी राजीनामेही दिले आहेत.

जून 2022 मध्ये कंपनीने 5,884 युनिट्सची विक्री केली आहे, तर मे मध्ये ती 9,256 युनिट्स होती. त्याच वेळी, एप्रिल 2022 मध्ये, कंपनीची सर्वोत्तम विक्री 13,000 युनिट्सची होती. जून महिन्यात एथर एनर्जीची (Aether Energy) विक्रीही 3,823 युनिट्सपर्यंत कमी झाली आहे.

रिव्हॉल्टची (Revolt) सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल :-

इलेक्ट्रिक मोटरसायकल बनवणाऱ्या देशातील आघाडीच्या कंपनी रिव्हॉल्टची विक्री चांगलीच झाली आहे. कंपनीने जूनमध्ये 2,424 बाइक्सची नोंदणी केली आहे. दुसरीकडे, स्वॅप करण्या योग्य बॅटरीसह इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी कंपनी बाउन्स इन्फिनिटीने जून महिन्यापासून आपल्या स्कूटर्सची डिलिव्हरी सुरू केली आहे.

जानेवारी ते जून या कालावधीत देशात एकूण 2,40,662 इलेक्ट्रिक टू-व्हीलरची नोंदणी झाली आहे. या कालावधीत देशात विकल्या गेलेल्या एकूण 66,95,434 दुचाकींपैकी हे 3.6% आहे.

तुम्हालाही 180KM रेंज ची Okinawa स्कुटरचे रेंज, फीचर्स, किंमत पाहायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

180KM रेंज ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च | पहा ‘हे’ जबरदस्त फीचर्स अन् किंमत…

Leave A Reply

Your email address will not be published.