9 दिवसात 30 देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चं तांडव ; Delta पेक्षा किती खतरनाक ? काय आहेत लक्षणं, जाणून घ्या ‘ओमिक्रॉन’ बद्दल सर्वकाही…

0

शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमिक्रॉन अवघ्या नऊ दिवसांत 30 देशांमध्ये पसरला आहे. दक्षिण आफ्रिकेपासून सुरू झालेला हा प्रकार आता भारतातही पोहोचला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहे. इतकेच नाही तर या व्हेरियंटचा प्रसार डेल्टा डेल्टापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात दुसरी लाट आली होती. ओमिक्रॉन (Omicron) आतापर्यंत कोणत्या देशांमध्ये पसरला आहे अन् तो डेल्टा (Delta) पासून ते किती खतरनाक आहे ते जाणून घेऊया…

Omicron चा वेग Delta पेक्षा 5 पटीने भारी :-

24 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये प्रथम रुग्ण आढळले.

26 नोव्हेंबर : जागतिक आरोग्य संघटनेने या प्रकाराला ‘ओमिक्रॉन’ (Omicron) असं नाव दिलं. नेदरलँड, इस्रायल, हाँगकाँग आणि बेल्जियम या आणखी चार देशांमध्ये त्याचा प्रसार झाला.

27 नोव्हेंबर : ऑमिक्रॉनने ऑस्ट्रेलिया, चेक गणराज्य, इटली, जर्मनी आणि यूकेमध्येही आढळून आला.

नोव्हेंबर 28 : ओमिक्रॉन डेन्मार्क आणि ऑस्ट्रिया या आणखी दोन देशांमध्येही पोहोचला.

29 नोव्हेंबर : कॅनडा, स्वीडन, स्पेन आणि स्वित्झर्लंडमध्येही या व्हेरियंटची लागण झालेले लोक आढळून आले.

नोव्हेंबर 30: फ्रान्स, जपान आणि पोर्तुगालमध्ये देखील ओमिक्रॉन – संक्रमित रुग्णांची पुष्टी झाली.

01 डिसेंबर : हा प्रकार आणखी नऊ देशांमध्ये पसरला. यामध्ये सौदी अरेबिया, ब्राझील, दक्षिण कोरिया, यूएसए, नॉर्वे, आयर्लंड, घाना, नायजेरिया, यूएई यांचा समावेश आहे

ओमिक्रॉन वि डेल्टा (Omicron vs Delta) : कोण आहे जास्त खतरनाक :-

ओमिक्रॉन (omicron) :-

ओमिक्रॉनमध्ये एकूण 53 म्यूटेशन झाले आहेत, त्यापैकी 32 म्यूटेशन त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये झाले आहेत.
ओमिक्रॉनच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्येही 10 म्यूटेशन झाले आहेत.

डेल्टा (Delta) : –

डेल्टा व्हेरियंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये एकूण 18 म्यूटेशन होते. हा व्हायरस केवळ स्पाइक प्रोटीनद्वारे शरीरात प्रवेश करतो.
डेल्टा व्हेरियंटमध्ये फक्त 2 म्यूटेशन होते. रिसेप्टर बाइंडिंग डोमेन हा व्हायरसचा भाग आहे जो मानवी शरीराच्या पेशीच्या संपर्कात येतो.

डेल्टा चा वेग जास्त की ओमिक्रॉनचा :-

ओमिक्रॉनचे आर व्हॅल्यू डेल्टाच्या तुलनेत सहा पटीने जास्त आहे, याचा अर्थ असा की, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण 35-45 लोकांना संक्रमित करू शकतो.
डेल्टा प्रकाराचे आर मूल्य 6-7 होते. याचा अर्थ असा की, डेल्टा वेरिएंटने संक्रमित व्यक्ती 6-7 लोकांमध्ये व्हायरस पसरवू शकते.

‘ओमिक्रॉन’वर लसीचा प्रभाव किती ?

ओमिक्रॉन व्हेरियंटमधील स्पाइक प्रोटीनमध्ये 30 पेक्षा जास्त म्युटेशन असल्याने सध्याच्या लसी त्यावर फारच कमी प्रभावी ठरतील अशी अपेक्षा आहे.
डेल्टा व्हेरियंटवर कोविशील्ड लस खूप प्रभावी होती. या लसीची परिणामकारकता (Efficacy) 63 % होती.

ओमिक्रॉन व डेल्टा मधील वेगवेगळी लक्षणे :-

ओमिक्रॉनची लक्षणे डेल्टाच्या लक्षणांपेक्षा थोडी वेगळी असू शकतात. उदाहरणार्थ, ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये जिभेला चव व नाकाला गंध (वास ) येत नाही.
तर डेल्टा व्हेरियंट मध्ये येतो.

हे निश्चितपणे सांगणे कठीण असलं तरी. डब्ल्यूएचओचे (WHO) म्हणणं आहे की, सध्या असा कोणताही पुरावा नाही की ओमिक्रॉनची लक्षणे कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरियंट पेक्षा वेगळी आहेत. याचा अर्थ, चव आणि वास कमी होणे वगळता, डेल्टा आणि ओमिक्रॉनची प्रमुख लक्षणे सारखीच आहेत, जसे की घसा खवखवणे, ताप, थकवा आणि डोकेदुखी.

या देशांनी आपल्या सीमा केल्या बंद :-

ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता इस्रायल, जपान आणि मोरोक्कोने त्यांच्या सीमा सील केल्या आहेत.
इस्रायलने परदेशातून येणाऱ्या लोकांना पुढील 14 दिवसांसाठी देशात येण्यास बंदी घातली आहे.
परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी जपानने आपल्या सीमा एका महिन्यासाठी बंद केल्या आहेत.
मोरोक्कोने इतर देशांमधून येणारी सर्व उड्डाणे दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.