विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी – विक्री केंद्रावर नविन लाल (पावसाळी) कांदा लिलावाचा शुभारंभ कृउबा उपसभापती व्ही. चव्हाण यांच्या हस्त करण्यात आला. मुंगस येथील शेतकरी सुधाकर रौंदळ यांनी मुहूर्ताच्यावेळी बैलगाडी मधून आणलेल्या कांद्यास सवाच्च 11 हजार 111 रुपयांचा सर्वोच्च भाव मिळाला.

मुंगसे कांदा खरेदी – विक्री केंद्रावर दरवर्षी विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर नविन लाल पावसाळी कांदा लिलावाचा शुभारंभ करण्यात येतो. यावर्षी ही सालाबादाप्रमाणे मंगळवारी (दि. 24) रोजी सकाळच्या लिलावात नवीन लाल कांदा खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी उपसभापती चव्हाण यांच्या हस्ते बैलगाडीतून विक्रीस आलेल्या नविन कांद्याचे पुजन करून कांदा उत्पादक शेतकरी रौंदळ यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर लिलावास प्रारंभ करण्यात आला. यावेळी राहूल आडतचे संचालक व कांदा व्यापारी राहूल सूर्यवंशी यांनी सर्वोच्च बोली लावत 11 हजार 111 रुपये दराने नविन लाल कांदा खरेदी केला.

यावेळी 119 वाहनातून कांदा शेतकऱ्यांनी विक्रीस आणला होता. लाल कांदा सरासरी 3 हजार 250 तर कमीत कमी 1 हजार 50 रूपये प्रती क्विंटल तर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4 हजार 51, सरासरी 3 हजार 850 तर कमीत 1 हजार 200 रूपये प्रती क्विंटल भाव होता. 250 वाहनातून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणला होता .

उमराणेत मिळाला 9 हजार 111 रुपये..

सालाबादाप्रमाणे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर येथील स्व. निवृत्तीकाका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांदा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे, उपसभापती मिलिंद शेवाळे सर्व संचालक व्यापारी, सचिव नितीन जाधव, उपसचिव तुषार गायकवाड यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सर्व कर्मचारी यांचेसह शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. शुभ मुहूतांवर प्रथम येणारे शेतकरी कौतिक सुकदेव निकम (रा. मांजरे) यांनी बैलगाडीतून आणलेल्या लाल कांद्याला मुहूर्तावर उच्चांकी 9 हजार 111 रुपये बाजारभाव मिळाला असून रामकृष्ण आडतीचे मालक अशोक राजेंद्र आहेर यांनी सदरचा कांदा खरेदी केला.

पहा आजचे कांदा बाजारभाव..

मुहूर्तावर शेतकऱ्यांनी बैलगाडी 6, पिकअप 35 ट्रॅक्टर 42 अशा एकुण 82 वाहनातून कांदा विक्री आणला होता. लाल कांद्याला सरासरी बाजारभाव 3 हजार 200 रुपये असा राहिला.

उन्हाळ कांदा ट्रॅक्टर पिकअप सह एकुण 363 वाहनांची आवक होती त्यास सरासरी कमाल 4 हजार 451 तर किमान 3 हजार 500 रुपये बाजार बाजारभाव मिळाला. बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांनी शेतकरी कौतिक निकम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. शेतकऱ्यांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यास बाजार समिती कटिबद्ध असून मार्केट यार्डात शेतकऱ्यास कोल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची काळजी बाजार समिती निश्चितच घेईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *