पशुपालकांसाठी खुशखबर ! 1 गाय / म्हैस करिता 32000 रु. शेळ्यांसह कुक्कुटपालनासाठी 60,000 रुपये. मिळणार, जिल्हा पशुसंवर्धनाकडून अर्जाचे आवाहन..
दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुट पालक व्यावसायिकांसाठी पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत पशुपालकांना तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध केले जाते. या कर्ज योजनेचा पशुपालक व्यावसायिकांनी लाभ घेण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय संस्था व स्थानिक बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना शेतीसाठी कृषी कर्ज मिळते त्याचप्रमाणे पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांनी दिले.
त्यानुसार, जिल्ह्यातील पशुपालक दुग्धव्यवसाय, शेळी व कुक्कट पालन व्यवसाय करणाऱ्यांना पशुपालक व्यावसायिकांस खेळत्या भांडवलाकरिता कर्ज उपलब्ध होणार आहे.
या योजनेंतर्गत पशुपालक व्यावसायिकाकरिता कर्जाची कमाल मर्यादा 3 लाख रुपये राहील. यामध्ये एक लाखपर्यंत किसान क्रेडिट का अंतर्गत पीक कर्ज व दोन लाखपर्यंत पशुपालक व मत्सव्यवसायाचे कर्जाचा समावेश राहील.
या कर्ज योजनेचा लाभ घण्यासाठी पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधावा. तसेच स्थानिक बँकाल शाखा व्यवस्थापकांचे मार्गदर्शन घ्यावे.
पशुसंवर्धन हा शाश्वत व्यवसाय असून पुशसंवर्धन व्यवसायामध्ये प्रतिकूल हवामानाचा परिणाम कृषी क्षेत्रापेक्षा कमी होतो. पशुजन्य उत्पादनाच्या
किमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार होत नाहीत. तसेच पशुसाठी विमा छत्र उपलब्ध असल्याने या व्यवसायामध्ये जोखीम कमी आहे. यामुळे सर्व स्थानिक शाखा व्यवस्थापकांनी पशुव्यावसायिकास योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन राज्यातील पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
असे मिळणार कर्ज :-
दूध व्यवसाय (1 मुऱ्हा म्हैस किंवा 1 संकरीत गाय) करिता 32 हजार रुपये
शेळी पालन (10 शेळवा 1 नर) करिता 17 हजार रुपये
कुक्कुट पालन ब्रॉयलर व कुक्कुट पालनलअर ब्रॉयलर (1000 पक्षी) करिता प्रत्येकी 60 हजार रुपये खेळते भांडवल कर्ज..
उपलब्ध होणार आहे. यामुळे पशुपालकांना व्यवसाय वृद्धी करण्यास मदत होणार असल्याने त्याचे जीवनमान उंचावल्या जाणार आहे. यासाठी ही योजना सहाय्यभूत ठरणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
जनावरांचे आरोग्य प्रमाणपत्र असावे.
विमा असलेल्या जनावरांवरच कर्ज मिळेल.
अर्जदाराचे आधार कार्ड.
पॅन कार्ड |
मतदार ओळखपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकार फोटो
पशु किसान क्रेडिट कार्ड अर्ज प्रक्रिया :-
पशु किसान क्रेडिट कार्डच्या SBI बँकेच्या अँप्लिकेशन फॉर्मसाठी :- इथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत बनवलेले पशु किसान क्रेडिट कार्ड मिळवू इच्छिणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करता येईल.
योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे बँकेत न्यावी लागतात.
यानंतर, तुम्हाला तेथून योजनेशी संबंधित अर्ज घ्यावा लागेल.
त्या फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक भरावी लागेल.
यानंतर, तुम्हाला तुमच्या आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रती फॉर्मसोबत संलग्न कराव्या लागतील आणि बँक अधिकाऱ्याला सबमिट कराव्या लागतील.
अर्जाच्या पडताळणीनंतर सुमारे एक महिन्याच्या आत तुम्हाला पशु क्रेडिट कार्ड मिळेल.