Take a fresh look at your lifestyle.

अकोले नगरपंचायत निवडणूक : पिचड पिता-पुत्रांनी गड कायम राखला !

शेतीशिवार टीम, 19 जानेवारी 2022 : 

 

अकोले निकाल- ( एकूण जागा 17 ) भाजप – 12 राष्ट्रवादी- 2 काँग्रेस- 1 शिवसेना – 2

Akole Nagar Panchayat Election Results 2022 :

प्रभाग क्र. 1 मध्ये शिवसेनेचे प्रमोद मंडलिक 416 मतांनी विजयी
प्रभाग क्र. 2 मध्ये भाजपचे सागर चौधरी 3 मतांनी विजयी,
प्रभाग क्र. 3 मध्ये प्रतिभा मनकर 481 मतांनी विजयी

प्रभाग क्र. 4 मध्ये भाजपचे हितेश कुंभार 250 मतांनी विजयी
प्रभाग क्र.5 भाजपच्या सोनालीताई नाईकवाडी 416 मतांनी विजयी
प्रभाग क्र. 6 राष्ट्रवादीच्या स्वेताली घोलप 363 मतांनी विजयी …

प्रभाग क्र. 7 मध्ये राष्ट्रवादी अरिफ शेख 393 मतांनी विजयी
प्रभाग 8 मध्ये बाळासाहेब वडजे भाजप 557 मतांनी विजयी
प्रभाग क्र. 9 मध्ये शितल वैद्य भाजप 347 मतांनी विजयी

प्रभाग क्र.10 मध्ये 137 मतांनी शिवसेना उमेदवार विजयी
प्रभाग क्र. 11 मध्ये वैष्णवी बबलु धुमाळ २५८ मतांनी विजयी
प्रभाग 12 मध्ये तमन्ना शेख ४२३ मतांनी विजयी

अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी उर्वरित चार प्रभागातून मंगळवारी (18 जानेवारी) सरासरी 80 टक्के मतदान झालं. मतमोजणीला सुरुवात झाली असून नगरपंचायतवर भाजप झेंडा फडकणार असं दिसून येत आहे.

सकाळी 11.30 वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील. आम्हीच नगरपंचायतवर झेंडा फडकणार असा विश्वास भाजपकडून व्यक्त होत आहे. तर 2019 च्या निवडणुकीत मतदारांनी सत्तांतराचे केलेले पानिपत 19 जानेवारीस पुन्हा एकदा आठवण करून देईल, असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे हे व्यक्त करत होते, तर महाविकास आघाडी न करताच स्वबळावर लढणारे काँग्रेसजण म्हणतात,

आमच्याशिवाय भाजप व इतर कोणीही सत्तेवर येऊच शकत नाहीत. किरकोळ कारणांवरून झालेली शाब्दिक चकमक सोडता सर्व मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.