Take a fresh look at your lifestyle.

Samruddhi Mahamarg: फडणवीसांनी चालवलेल्या गाडीची राज्यभर चर्चा, नेमकं काय आहे गाडीत असं खास ? किंमत पाहून व्हाल थक्क..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 11 डिसेंबर रोजी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील ५३० किलोमीटर महामार्गाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः स्टेअरिंगची कमान सांभाळत या महामार्गावर ड्रायव्हिंगचा आनंद घेतला.  

समृद्धी महामार्गास नागपूर येथून प्रारंभ होतो, त्यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हा पाहणी दौरा सुरु केला. या संपूर्ण मार्गात प्रवास करत पाहणी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः वाहनांची स्टेअरिंग संभाळली. समृद्धी हा द्रुतगती महामार्ग असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी या रस्त्यावरुन अक्षरश: 150 च्या स्पीडने गाडी चालवली. या महामार्गासोबतच आणखी एका गोष्टीची मोठी चर्चा झाली ती म्हणजे फडणवीसांनी चालवलेली गाडी. याबाबतचा अनुभव खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर खात्यावरून व्यक्त केला आहे.

..आणि फडणवीसांनी गाडी दामटली

मर्सिडीज बेंझ कंपनीच्या या कारचे नाव आहे (Mercedes-Benz G350d). ही कार मात्र बघताच क्षणी सर्वांच्याच नजरेत भरली होती. खास वेगवान प्रवासासाठी उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गाचा देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण फायदा घेत सुस्साट गाडी चालवली. अनेक दिवसांनी गाडी चालवत असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास 150 किमीच्या वेगाने गाडी दामटवली. यावरून ते एक कुशल वाहनचालक आहेत हे समजते. नागपूर ते शिर्डी हे 529 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी फडणवीस यांना अवघे साडे चार तास लागले.

कशी आहे कार

फडणवीस चालवत असलेली Mercedes-Benz G350d मर्सिडीज कार अनेकांच्या नजरेत भरली होती. या कारची किंमत 2 ते 3 कोटी रुपये इतकी आहे. मर्सिडीज जी-क्लास खास ऑफ-रोडिंगसाठी ओळखली जाते.

ही कार फक्त 7.4 सेकंदात 0 ते 100 किमी / ताशी वेग पकडू शकते. या अलिशान गाडीत थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, नऊ एअरबॅग्ज, नऊ गिअर, पॉवर व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स अशा सुविधा आहेत.

या लक्झरी एसयूव्हीमध्ये पॉवरफुल 3.0-लिटर इनलाइन सिक्स-सिलेंडर इंजिन आहे जे 286bhp पॉवर आणि 600Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 4-MATIC ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टीमद्वारे सर्व ऑल – व्हील ड्राइव्हला उर्जा पाठवते.

या एसयूव्हीचा टॉर्क डिस्ट्रीब्यूशन फ्रंट आणि रियर व्हील्समध्ये 40:60 आहे. कंपनीला विश्वास आहे की, हे इंजिन तुम्हाला सर्व प्रकारचे रस्ते आणि हवामानाच्या परिस्थितीत निराश करणार नाही. याचा सर्वाधिक वेग 199kmph आहे आणि तो फक्त 7.4 सेकंदात 0-100 kmph वरून वेग घेऊ शकतो. या एसयूव्हीमध्ये 75 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे.