सरकारने 1 एप्रिल 2023 पासून छोट्या बचतीवरील व्याजदरात बदल केला आहे. PPF वगळता सर्व बचत योजनांच्या व्याजदरात 10-70 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्याच्या योजनांमध्ये, 5 वर्षांसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते देखील आहे.
कोणतीही जोखीम न घेता हमी उत्पन्न मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या मुदत ठेव योजनेमध्ये सरकारने व्याज दर 7 टक्क्यांवरून 7.5 टक्के वार्षिक केला आहे. पोस्ट ऑफिसच्या या 5 वर्षांच्या मुदत ठेव योजनेमध्ये, ठेवीदार आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ घेऊ शकतात.
पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या FD वर 1 एप्रिल 2023 पासून ग्राहकाला 7.5% व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिस एफडी कॅल्क्युलेटर 2023 नुसार, जर 10 लाख रुपये जमा केले तर नियमित ग्राहकाला मॅच्युरिटीवर 14,49,948 रुपये मिळतील. यामध्ये फक्त व्याजातून 4,49,948 रुपये मिळतील. म्हणजेच 5 वर्षांत सुमारे साडेचार लाख रुपयांचे हमीभाव व्याजातून मिळणार आहे.
गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी ठेवी करू शकतात. मुदत ठेव मॅच्युरिटीनंतर कॅरी फॉरवर्ड करता येते. सिंगल खाते आणि जॉईंट खाते देखील टाइम डिपॉजिट अंतर्गत उघडले जाते.
एका जॉईंटखात्यात जास्तीत जास्त 3 प्रौढांचा समावेश केला जाऊ शकतो. हे खाते किमान 1000 रुपयांमध्ये उघडता येते. यानंतर तुम्ही यामध्ये रु. 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिस टीडीमध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही. वित्त मंत्रालय दर तिमाहीत लहान बचतींवरील व्याजदरांचा आढावा घेते.
5 वर्षांच्या TD वर टॅक्स लाभ..
पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांच्या एफडीवर कर सवलतीचा लाभ मिळतो. आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. येथे लक्षात ठेवा की, FD मध्ये मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम करपात्र असते.
पोस्ट ऑफिस टीडीला 1 वर्षासाठी 6.8%, 2 वर्षांसाठी 6.9% आणि 3 वर्षांसाठी 7.0% व्याज मिळत आहे. या योजनेत, व्याज दर तिमाही आधारावर मोजले जातात, परंतु पेमेंट वार्षिक आधारावर केले जाते.