Take a fresh look at your lifestyle.

Pune-Bengaluru Expressway : आता फक्त 7 तासांत अंतर पूर्ण होणार, ८३८ किमी अंतरासाठी ४०,००० कोटींचा खर्च, पहा रोड मॅप..

0

पुणे – बंगळुरू ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वेच्या (ग्रीनफिल्ड कॉरिडॉर) प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम अंतिम टप्प्यात आले आहे. अहवाल लवकरच अंतिम करून तो केंद्राला सादर केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) हे काम करण्यात येत आहे.

देशातील निवडक शहरे महानगरांना जोडण्यासाठी ‘भारतमाला’ प्रकल्पांतर्गत सुमारे तीन हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे. हे सर्व महामार्ग हरित असणार आहेत. त्यामध्ये पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश करण्यात आला आहे.

सध्याचा पुणे- बंगळुरू महामार्ग ८३८ किलोमीटरचा आहे. नवा हरित महामार्ग ७४५ किलोमीटरचा असणार आहे. त्यामुळे पुणे आणि बंगळुरू महानगरे आणखी जवळ येणार आहेत. या महामार्गासाठी सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

पुणे-बेंगळुरू ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमुळे या दोन शहरांमधील अंतर ९५ किमीने कमी होणार आहे. याशिवाय प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ग्रीनफिल्ड कॉरिडॉरमध्ये आपत्कालीन लँडिंगसाठी प्रत्येकी पाच किलोमीटरच्या दोन हवाई पट्ट्या असून हा महामार्ग आठपदरी असणार असून १२० कि.मी. वेगाने या महामार्गावरून जाता येणे शक्य आहे. हा पूर्णपणे नवा द्रुतगती महामार्ग आहे. वरवे बुद्रुकपासून हा महामार्ग सुरू होणार आहे. (Pune-Bengaluru Expressway)

या महामार्गावर सहा मार्गिका प्रस्तावित आहेत. समृद्धी महामार्ग लक्षात घेता हा महामार्ग संपूर्णतः डांबरी असणार आहे. हा मार्ग पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह इतर शहरामधून थेट न जाता पथकर नाक्यांपासून जवळच्या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.

बातमी : पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड महामार्ग : पुणे-सातारा – सांगलीतील ‘या’ गावांतून जाणार, पहा, पूर्ण Road Map Alignment

जो परिसर किंवा भाग यापूर्वी रस्त्याने जोडलेले नाहीत, अशा ठिकाणी या हरित महामार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भूसंपादन करताना जास्त खर्च येत नाही. याशिवाय स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होते, अशी माहिती एनएचएआयचे प्रकल्प संचालक डी. कदम यांनी दिली.

कसा आहे पुणे – बेंगळुरू महामार्ग प्रकल्प ?

1. ग्रीनफिल्ड वरवे – बुद्रुक येथून सुरू होतो.

2. सहा लेन

3. संपूर्ण रस्ता डांबरी आहे. सिमेंटचा वापर नाही..

4. १०० मीटर रुंदी (पुणे – मुंबई द्रुतगती मार्गापेक्षा मोठा)

5. 745 किमी मार्ग (आता मार्ग ८३८ किमी)

6. हा मार्ग सांगली, सातारा, कोल्हापूरसह इतर शहरांमधून थेट जाणार नाही..

बातमी : नवं राजपञक जारी, सांगलीनंतर आता साताऱ्यातील गावांची अन् शेतकऱ्यांची नावे जाहीर, पहा रोडमॅप..  

7. ट्रॅफिक जॅमवर कोणताही परिणाम होणार नाही.

8. ताशी १२० किमी वेगाने, बेंगळुरूला फक्त सात ते आठ तासांत पोहोचता येते (सध्या ११ ते १२ तास लागतात).

9. टोलनाक्यापासून आजूबाजूच्या गावांपर्यंत रस्ता तयार केला जाईल.

10. प्रवेश नियंत्रणामुळे, रस्त्यावरील वाहने थेट महामार्गावर प्रवेश करू शकणार नाहीत. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी टळणार आहे.

11. पुणे आणि बेंगळुरूमध्ये वाहतूक विस्कळीत न होता आपत्कालीन परिस्थितीत विमान थेट महामार्गावर उतरवण्यासाठी पाच किमीचा हवाई पट्टी असेल.

11. प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ४०,००० कोटी रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.