Sand Policy : पुणे जिल्हा दुसऱ्या स्थानावर ! ‘या’ 15 डेपोंवरून वाळू विक्री सुरू; 600 रुपये दराने मिळतेय 1 ब्रास वाळू, पहा ऑनलाईन नोंदणी..

0

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने नवीन वाळू धोरणाला मे महिन्यात संमती दिली. त्यानंतर महाराष्ट्रात नवीन वाळू धोरण लागू करण्यात आले. त्यानुसार राज्यात अवघ्या सहाशे रुपयांत एक ब्रास वाळू देण्यास सुरुवात झाली आहे. वाळू डेपो विक्रीत नागपूर जिल्हा प्रथम स्थानावर असून, पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पुणे जिल्ह्यात 15 वाळू डेपोचे लिलाव झाले आहेत. त्यापैकी सात डेपोवरून प्रत्यक्षात वाळू विक्रीला सुरुवात झाली आहे. चार डेपो वेळेत केले नसल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर उर्वरित चार डेपोंवर तांत्रिक तपासण्या करून लवकरच ते सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा खनीकर्म विभागाचे अधिकारी सुयोग जगताप यांनी दिली.

त्यानुसार पहिल्या टप्यात चार, दुसऱ्या टप्यात सहा, तिसऱ्या टप्यात चार आणि चौथ्या टप्यात 1 अशा 15 वाळू डेपोंचे लिलाव करण्यात आले. यामध्ये बारामती तालुक्यात मुरमाचा डेपो तयार करण्यात आला आहे. दौंड तालुक्यात कानगाव आणि नानवीज, पुरंदर तालुक्यात पांडेश्वर, शिरूर तालुक्यात चिंचणी आणि निमोणे अशा सात ठिकाणचे वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत.

तर इतर तालुक्यातील चार डेपोचे लिलाव झाले असताना निविदा भरणाऱ्यांनी अद्याप ते सुरू केलेले नाही, त्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहे. आठवडेभराच्या मुदतीत वाळू डेपो सुरू केले नाही, तर संबंधितांची निविदा रद्द करण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील चार ठिकाणचे वाळू डेपो सुरू झालेले नसून, यामध्ये ग्रामपंचायत पातळीवर स्थानिकांकडून खोडा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक पातळीवरील मतभेद, वाद – विवाद आणि इतर कारणांमुळे इतर वाळू डेपोंना सुरुवात झालेली नाही. परंतु, लवकच लिलाव होऊनही अद्याप सुरू न झालेले डेपो त्वरित सुरू करण्याचे आदेश गौण खनीज विभागाला देण्यात आले आहेत. नागरिकांना शासनाच्या धोरणानुसार वाळू मिळेल, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

वाळू बुकिंग साठी Online अर्ज कसा कराल ?

1) अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट – https://mahakhanij.maharashtra.gov.in/

2) या वेबसाईटवर आल्यानंतर उजव्या कोपऱ्यात तुम्ही तुम्हाला हवी आहे ती भाषा निवडून पुढे जा.

3) मेनू मध्ये sand booking हा ऑप्शन निवडा.

4) Sand Booking हा ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्या स्क्रीन वर वाळू बुकिंग चे नवीन पेज येईल.

5)आता तुमच्या स्क्रीन वर Login चे पेज येईल त्या मध्ये LOGIN हा ऑप्शन निवडा.

6) सर्वात अगोदर या पोर्टल वर Sign Up या ऑप्शन वर क्लिक करून नवीन Account बनवा.

7) Account बनवण्यासाठी , तुमचं नाव,मोबाईल नंबर, Email टाकून Submit या बटनावर क्लिक करा.

8) त्यानंतर तुमच्या मोबाईल वर तुमचा User ID येईल.

9) त्यानंतर पुन्हा महाखनिज या पोर्टल जाऊन पुन्हा LOGIN या बटणावर क्लिक करा.

10) तुम्हाला SMS द्वारे तुमचे User Name आले असेल ते User Name या ठिकाणी टाकून घ्या.

11) त्यानंतर Password तयार करून घ्या मग कॅपचा कोड टाकून लॉगीन करा.

12) लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Dashboard मध्ये तुमची सर्व माहिती टाकून आधार कार्ड चा फोटो अपलोड करून प्रोफाइल बनवा.

13) रजिस्टर प्रोजेक्ट वर क्लिक करून तुमच्या बाधकामाची पूर्ण माहिती टाका प्रोजेक्ट रजिस्टर करा.

14) त्यानंतर Book Sand या क्लिक करून त्यामध्ये सर्व आवश्यक ती माहिती भरून Apply वर क्लिक करा.

15) Depot Selection या ऑप्शन वर क्लिक करुन तुमच्या जवळील वाळू डोपो निवडा त्या नंतर पेमेंट करा पेमेंट Success झाल्यावर तुमच्या मोबाईल वर SMS येईल नंतर तुमची वाळू साठी ऑर्डर प्लेस होईल..

अश्या प्रकारे वाळू बुक करू शकता.. (टीप – वाळू बुकिंगसाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता, किंवा तुमच्या जवळच्या वाळू डेपोला भेट देऊ शकता.)

Leave A Reply

Your email address will not be published.