Pune Metro : आता वनाज ते रामवाडी प्रवास फक्त 30 मिनिटांत ! पहा मेट्रोचे नवे वेळापत्रक अन् तिकीट दर..
रुबी हॉल क्लिनिक स्थानक रामवाडी स्थानक या मार्गाचे उद्घाटन झाल्यामुळे वनाझ ते रामवाडी हा मेट्रो मार्ग पूर्ण झाला आहे. यामुळे पूर्व पुणे व पश्चिम पुणे मेट्रोच्या सहाय्याने जोडले गेले आहे. या मार्गिकमुळे विमाननगर, येरवडा, कल्याणीनगर, चंदननगर, शाखीनगर, खराडी, वडगावशेरी, तळेगाव या भागातील नागरिकांना फायदा होणार आहे.
या मार्गिकेमुळे वनाझ ते रामवाडी असा 14.5 किमी चा प्रवास अवघ्या 36 मिनिटांत करणे शक्य होणार आहे. तसेच, प्रवासी भाडे 30 रुपये असणार आहे. त्याचबरोबर या रामवाडी स्थानकाच्या परिसरात असणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना प्रवास करणे सुलभ होणार आहे.
भूमिपूजन झालेल्या चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते निगडी (4.4 किमी उन्नत मार्ग) नवीन मार्गिकेवर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्थानके आहे. या मार्गिकेमुळे भक्ती – शक्ती चौक ते स्वारगेट असा थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या रुबी हॉल क्लिनिक स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गिकेमुळे पूर्व पुणे व पश्चिम पुणे मेट्रोच्या नेटवर्कच्या सहाय्याने जोडले गेले आहे. नागरिकांना लांबचा प्रवास करण्याचा फायदा यातून मिळेल आणि चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक निगडी हा पुणे मेट्रोच्या मार्गिकेचा नैसर्गिक विस्तार असून, यामुळे त्या भागातील रहिवासी भागाला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
बनाझ ते रुबी हॉल क्लिनिक मार्गाचा रामवाडीपर्यंत आता विस्तार झाला आहे, आता स्वारगेटपर्यंत मेट्रोच्या मार्गांचे उद्घाटन कधी होणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. दरम्यान, मेट्रो पुणेकरांच्या चांगलीच पसंतीला उतरली असून आता या पुढे मेट्रो मार्गांचा विस्तार कधी होणार अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे.
असे आहे नवीन वेळापत्रक अन् तिकीट दर..
भाडे आणि सेवेचे तपशील :-
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी
या मार्गाचे एकूण भाडे 20 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
PCMC – दिवाणी न्यायालय मार्ग :
सेवेच्या वेळा : कामाचे तास सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत पीक आणि नॉन-पीक अवर्समध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसह..
द्वारे शिफारस केली आहे
प्रवास वेळ : PCMC ते दिवाणी न्यायालयाचा प्रवास कालावधी अंदाजे 25 मिनिटे आहे, 13 किमी अंतर आहे.
वनाज – रामवाडी मार्ग :-
सेवेची वेळ : सेवा वेळ सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत आहे.
या मार्गाचे एकूण भाडे 30 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
प्रवास वेळ : वनाझ ते रामवाडी प्रवासाचा वेळ 36 मिनिटे अपेक्षित आहे, 14.5 किमी अंतर कापून..
पिंपरी ते निगडी मार्ग 39 महिन्यांत पूर्ण होणार..
स्वारगेट ते पिपरी मार्गाला जोडून पुढे निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार व्हावा, या पिंपरी- चिचवडकरांच्या मागणीला यश आले. पिपरी ते निगडी मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी (दि. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीव्दारे पार पडले.
शहरातील पीसीएमसी मेट्रो स्थानकावर हा कार्यक्रम पार पडला. कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे ऑनलाइन लोकार्पण व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचा देखील समावेश होता.
स्वारगेट ते पिपरी या मार्गीकवरील दापोडीतील हरिस ब्रिजपासूनचा मेट्रा मार्ग पिंपरी – चिचवड शहराच्या हद्दीत येतो. मेट्रो पिंपरी पर्यंत आली.मात्र ती निगडी पर्यंत सुरु होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली. त्यानुसार महामेट्रोकडून या विस्तारित मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे गेला.
या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. या मार्गाचे भूमिपूजन बुधवारी झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. काम 39 महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे महामेट्रोकडून सांगितले जात आहे. दरम्यान यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर मेट्रो मार्गाांचे व फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी मेट्रोच्या टप्यांचे लोकार्पण 1 ऑगस्ट 2023 रोजी उद्घाटन झालेले आहे..