पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे, या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले.
किवळे (ता:खेड) येथे पीएमआरडीच्या निधीतून मंजूर झालेल्या 3 कोटी 67 लक्ष 53 हजार रुपयांच्या कोये ते किवळे रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
आ. मोहिते पाटील म्हणाले, पुणे – नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे, तो रस्ता म्हाळुंगे – आंबेठाण – कोरेगाव किवळे – कडूस – चास , घोडेगाव – जुन्नर – अकोले – संगमनेर असा असणार आहे. खाजगी विकासकाडून तो रस्ता विकसित केला जाणार आहे.
या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे. त्याचबरोबर उरण – पनवेल – कर्जत – पाईट राजगुरुनगर – शिरूर या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळाली असून या रस्त्यांचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याची कामे सुरू आहेत.
बोरघाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई – पुणे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून उरण – पनवेल – कर्जत वांद्रे – आंबोली- पाईट- राजगुरूनगर- शिरूर हा रस्ता झाल्याने पुणे- नगर , पुणे – नाशिक , पुणे – मुंबई या रस्तावरील वाहतूक कोंडी होणार नाही. दोन राष्ट्रीय महामार्ग या परिसरातून जाणार आहेत. त्यामुळे या गावचे महत्त्व वाढणार आहे. या रस्त्यावर दोन्ही कोरेगावांमध्ये जोडणारा भामा नदीवर मोठा पूल आहे. त्याचबरोबर चास या ठिकाणी देखील मोठा पूल प्रस्तावित असल्याचे आ. मोहिते पाटील यांनी सांगितले.
यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे, माजी सभापती विनायक घुमटकर, माजी सभापती नवनाथ होले, सुरेश शिंदे, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, माजी उपसभापती अशोक राक्षे जयसिंग भोगाडे, विनोद टोपे, पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमंद, वैभव नाइकरे, अभिजित शेंडे, रामदास शेलार, समीर राळे धमणेचे सरपंच महेंद्र कोळेकर, पाईटच्या सरपंच मंगल भांगे, अहिरेच्या सरपंच सुनिता आहेरकर, तोरणेच्या सरपंच आरती शिंदे, नितीन भोकसे, रखमा गोगावले, अनिल डांगले, बाळासाहेब पापळ, पोपट कल्हाटकर,
माजी सरपंच दिगंबर कदम, उद्योजक कैलास कदम, सरपंच स्वाती कदम, माजी सरपंच शांताराम जोरे, महेंद्र म्हसे, मनोज साळुंखे, चेअरमन बाजीराव चौधरी, दौलत कदम, वैशाली कदम, रोहिदास साळुंखे, मनोहर कदम, महादू लिंबळे, सुभाष शिवले, अंकुश कदम, शिवराम शिवले, संदीप शिवले, दत्ता कोंढाकेकर चिंतामण कदम, बाळू आढाव, ज्ञानेश्वर वाळके यांच्यासह किवळे गावातील सर्व ग्रामस्थ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सभापती माणिक कदम यांनी केले, सूत्रसंचालन बाळासाहेब घाटे यांनी केले. आभार माजी सरपंच दिगंबर कदम यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, माजी सभापती माणिक कदम यांनी केले होते.