आपलं शेतातलं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी सातत्याने विविध प्रयत्न करत असतात. यामध्ये त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा लाभ घेत शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून नवनवीन प्रयोग करत असून त्यांना यशही मिळत आहे. असाच एक प्रयोग पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील एका युवा शेतकऱ्याने फळबागांची लागवड करत फक्त 30 गुंठ्यात 9 लाखांचा भरघोस नफा मिळवला आहे. त्याच्या यशोगाथेबद्दल आपण जाणून घेउयात…
अंजीर (fig ) हे वैशिष्टपूर्ण फळ आहे. इतर फळागेक्षा ते मौल्यवान मानले जाते कारण ते पित्तविरोधी आणि रक्तशुद्धीरोधक आहेत. भारत, अमेरिका आणि आफ्रिका सह अनेक देशांमध्ये अंजीरांची लागवड केली जाते. त्याचे फळ ताजे आणि सुकलेले आशा दोन्ही प्रकारचे असते. अंजीर पिकल्यावर त्याचा मुरांब्बा बनवून वापरता येते. ज्या ठिकाणी हवामान समशीतोष्ण आणि कोरडे असते अशा भागात अंजीरची लागवड केली जाते.
भारतात तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागात याची लागवड केली जाते. चार-पाच वर्षांच्या झाडापासून सुमारे 15 किलो फळे मिळतात. पूर्णपणे परीपक्व झालेले झाड एका वेळी 12000 रुपयांपर्यंत नफा कमावून देऊ शकते.
हे एक आरोग्यदायी फळ आहे. इतर फळांपेक्षा याची गोडी अधिक असते. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. सर्दी, दमा, स्तनाचा कर्करोग आणि अपचन, नपुंसकता यांसारख्या आजारांमध्ये अंजीराचे सेवन खूप फायदेशीर आहे. व्यावसायिकदृष्ट्या पाहिले तर अंजीर हे खूप महाग फळ आहे. यातून अंजीर शेती करणारे शेतकरी खूप चांगला नफा मिळवू शकतात.
आणि याचाच फायदा घेत पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथील युवा शेतकऱ्याने 30 गुंठ्यातील अंजिराच्या शेतीतून तब्बल 9 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. सिंगापूर मधील तरुण शेतकरी अभिजित लवांडे यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीत चालणाऱ्या पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत अंजीर लागवडीचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी आपल्या 30 गुंठ्यांतील मुरमाड जमिनीमध्ये योग्य नियोजन आणि मेहनतीने अंजिराची फळशेती फुलवली आहे.
यासाठी त्यांनी सर्वप्रथम जेसीबीने 20X 20 अंतरावर खड्डे घेतले त्यामध्ये पाला-पाचोळा आणि कुजलेले शेणखत वापरून झंडाची लागवड करण्यात आली. त्यासोबतच उन्नीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यामध्ये थायमीठ घालण्यात आले. सुरवातीला खताची मात्रा 10 किलो शेणखत, 10 किलो लेंडीखत, 5 किलो गांडूळ खत अशी ठेवण्यात आली होती.
कधी कराल रोपांची लावणी
अंजीराच्या रोपांची लावणी जुलै ते ऑगस्ट महिन्यात केली जाते. यासाठी रोपवाटिके मध्ये रोपे तयार करावी लागतात. प्रति हेक्टरी 250 झाडे लागतात. प्रत्येक रोपातील अंतर 5 मीटर ठेवाने आवश्यक आहे. एकदा रोपांची लागवड झाल्यानंतर यातून 5 ते 6 महिन्यांमध्ये उत्पन्न चालू होते.
कटिंग आणि देखभाल करणे
अंजीराच्या रोपांची कटिंग अश्या प्रकारे करावी की त्याची वाढ प्रत्येक दिशेने सारखी होईल आणि सूर्यप्रकाश झाडाच्या प्रत्येक भागात पोहोचू शकेल. यामध्ये एक ते दोन वर्षे जुन्या डहाळ्यांवर नवीन फांद्या बाहेर पडताना फळे येतात. म्हणून, सुरुवातीच्या वर्षांत या प्रकारच्या डहाळ्यांना वाव दिला पाहिजे. जुन्या झाडांची छाटणी फायदेशीर आहे. रोगट व कोरड्या फांद्यांची छाटणी विषय करावी असे अभिजित यांनी सांगितले.
कीटक आणि रोग प्रतिबंध
अंजीरमध्ये कोणतेही मोठे कीटक किंवा रोग आढळून येत नाहीत, परंतु काही प्रकरणांमध्ये पाने आणि साल खाणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान किंवा क्लोरोफायरीफॉस 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास फायदा होईल.
तोडणी आणि विक्री
फळांची हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्यांना सासवड,पुणे, मुंबई येथील बाजारपेठांमध्ये पाठवले जात होते मात्र परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पुरंदर हायलँड नावाने अंजिराची ब्रॅण्डिंग करून ते थेट जर्मनीच्या बाजारपेठेत पाठवले आहे. फळ जास्तीत जास्त दिवस टिकावे आणि फ्रेश राहावे यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा असा सल्लाही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
अभिजित लवांडे :- 9168987070 सिंगापूर, पुरंदर – पुणे – 412104