Rupee Falls : सर्वसामान्यांना महागाईचा पुन्हा मोठा झटका । रुपया 80.05 च्या रेकॉर्ड नीचांकी पातळीवर, आता ‘या’ वस्तूंच्या भाववाढीला तयार रहा…

0

शेतीशिवार टीम : 19 जुलै 2022 :- आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 7 पैशांनी घसरून 80.05 या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला आहे. सोमवारी रुपया 79.97 वर बंद झाला होता.

या वर्षी आतापर्यंत भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर 7.5% वर आहे. डॉलर निर्देशांक सोमवारी एका आठवड्याच्या नीचांकी पातळीवर घसरला आणि 107.338 वर पोहोचला. गेल्या आठवड्यात, डॉलर निर्देशांक 109.2 पर्यंत वाढला, जो सप्टेंबर 2022 नंतरचा उच्चांक आहे…

तसं पाहिलं तर, डॉलर इतका महाग कधीच नव्हता, बाजाराच्या भाषेत रुपयाने विक्रमी नीचांकी म्हणजेच आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठल्याचे बोललं जात आहे. चलनाची किंमत दिवसेंदिवस वाढतच आहे. डॉलरची गरज वाढतच गेली. त्या तुलनेत उर्वरित जगात आपल्या वस्तू किंवा सेवांची मागणी वाढली नाही, त्यामुळे डॉलर महाग झाला.

18% नंतर आता सर्वसामान्यांवर पुन्हा महागाईची वेळ :-

डॉलरच्या भाववाढीमुळे तेल आणि डाळींसाठी अधिक खर्च होणार असून, त्याचा परिणाम त्यांच्या किमतीवर होणार आहे. हे पदार्थ महाग होणार असल्याने तुमचे स्वयंपाकघरातील बजेट बिघडू शकतं. याशिवाय परदेशातील अभ्यास, प्रवास, डाळी, खाद्यतेल, कच्चे तेल, संगणक, लॅपटॉप, सोने, औषधे, रसायने, खते, यंत्रसामग्री, जी आयात केली जाते, ती महाग होऊ शकतात…

औषधे, मोबाईल, टीव्हीच्या किंमतींत होणार मोठी वाढ :-

भारत मोबाईल – लॅपटॉपसह अत्यावश्यक इलेक्ट्रिकल वस्तू आणि यंत्रसामग्रीसह मोठ्या प्रमाणात औषधे आयात करतो. बहुतेक मोबाईल आणि गॅझेट्स चीन आणि इतर पूर्व आशियाई शहरांमधून आयात केले जातात आणि बहुतेक व्यवसाय डॉलरमध्ये केला जातो. रुपयाचे असेच अवमूल्यन होत राहिल्यास देशात आयात महाग होईल. परदेशातून होणाऱ्या आयातीमुळे त्यांच्या किमती वाढणार आहेत. म्हणजे मोबाईल आणि इतर गॅजेट्सवर महागाई वाढेल आणि तुम्हाला जास्त खर्च करावा लागेल…

किचन बजेटवर परिणाम :-

भारत 80% कच्च्या तेलाची आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमतीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे मालवाहतूक महाग होते. अशा परिस्थितीत रुपयाच्या कमकुवतपणामुळे स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढू शकतात, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळे भाडेही वाढू शकते, त्यामुळे प्रवास महाग होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.