विजेअभावी शेतातील पिकांना पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची पिके वाळत असल्याचे वास्तव आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी योजना कार्यान्वित कला असून, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवून दिले जाणार आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यात 340 मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून, यासाठी 1700 एकर सरकारी जमीन मागणीचा प्रस्ताव महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीतून कोल्हापूर जिल्ह्यातील 140 वीज उपकेंद्रांच्या परिसरात खाजगी ठेकेदारामार्फत सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. 2025 पर्यंत सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, राज्य शासनाने हे उचलेले क्रांतिकारी पाऊल आहे.
विशेष म्हणजे 24 तास अखंडित वीजपुरवठा होणार असून, वीज बिलाचीही कटकट शेतकऱ्याला नसेल. गेली अनेक वर्षे शेती पंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवली जात आहे.
वीज उपकेंद्रापासून 5 कि.मी. परिसरात हे प्रकल्प उभारले जातील. सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प कृषी पंपासाठी प्रतिदिन 450 मेगावॅट पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांची वीज भारनियमनातून सुटका होईल आणि दिवसा वीज मिळण्यास मदत होईल.
फक्त 12,750 रुपयांत शेतात लावा 3 लाखांचा सोलर पंप, प्रोसेस पाहण्यासाठी..
शेतकऱ्यांना मिळणार जमिनीचे भाडे :-
सरकारी जमिनीसाठी एकरी नाममात्र 1 रुपया भाडे आकारले जाईल, तर खासगी जमिनीवर प्रकल्प उभारल्यास वार्षिक एकरी 50 हजार रुपये भाडे दिले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कृषी पंपाच्या 1 लाख 51 हजार वीज जोडण्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा मिळाली तर त्याचा फायदा हा शेती उत्पादनावर होणार असून उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
वीज महावितरण खरेदी करणार :-
महावितरणनाचा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 1172 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात 1700 एकर जमिनीवर 340 मेगावॅट, तर सांगली जिल्ह्यात 4160 एकर जमिनीवर 832 मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारले जातील. त्यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्याकडे शासकीय जमीन मागणीचे प्रस्ताव दिले आहेत. या प्रकल्पातून तयार होणारी वीज पुढील 30 वर्ष महावितरण खरेदी करणार आहे.
पडीक जमीन भाड्याने द्या अन् दिवसा 12 तास विजेसह मिळवा 1.50 लाखांपर्यंत भाडे..
दोन वर्षांत 1 लाख कृषी पंप जोडणार : –
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही संपूर्णपणे राज्य शासनाची योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत आगामी तीन वर्षांच्या कालावधीत टप्याटप्याने एक लाख सौर कृषी पंप बसवण्याचा शासनाचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्यात 25 हजार सौर कृषी पंप, दुसऱ्या टप्प्यात 50 हजार सौर कृषी पंप आणि तिसऱ्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठरले आहे. प्रत्येक टप्पा 18 महिन्यात राबवून ही योजना पूर्ण केली जाणार असून, प्रायोगिक तत्त्वावर कोल्हापूर जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.