Take a fresh look at your lifestyle.

Share Market : वर्षभरापूर्वी फक्त 4 रु. अन् आता 176 रु ; 1 लाखांचे झाले 45 लाख ; आज तर 10 % वाढ….

शेतीशिवार टीम, 23 डिसेंबर 2021 : गेल्या काही दिवसांत शेअर बाजाराने आपल्या गुंतवणूकदारांना शानदार रिटर्न्स दिले आहे. बाजारात असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

आज आपण अशाच पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देऊन श्रीमंत केलं आहे. हा शेयर्स आहे टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर कंपनी डिग्जमचा (DIGJAM Ltd) आहे.

डिग्जम (DIGJAM Ltd) स्टॉक प्राइसने एका वर्षात 4,412% रिटर्न्स दिले आहे. 22 डिसेंबर 2020 रोजी हा फक्त रु. 3.90 वर बंद झाला, जो 22 डिसेंबर 2021 रोजी बॉम्बे स्टॉकने एक्सचेंज (BSE) वर रु. 176 चा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे.

1 लाखांचे झाले तब्बल 45 लाख :-

एका वर्षापूर्वी जर कोणी डिग्झॅमच्या (DIGJAM) शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर ती रक्कम 45.12 लाख रुपये झाली असती. तर BSE वर काल सकाळी 4.98 टक्क्यांच्या वाढीसह शेअर 176 रुपयांवर व्यवहार करत होता. परंतु आज सकाळपर्यंत यामध्ये पुन्हा भरगोस वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज हा स्टॉक +8.70 वाढीसह 183.20 लेव्हलवर ट्रेंड करत आहे. त्यामुळे या कापड उत्पादक कंपनीचे मार्केट कॅप 35.20 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

शेयर्समध्ये तब्बल 4,192 % वाढ :-

या वर्षाच्या सुरुवातीपासून डिग्झॅमचा (DIGJAM) स्टॉक 4,192% वाढला आहे. आणि एका महिन्यात 191.15% वाढला आहे. गेल्या 21 दिवसात मिडकॅप शेअर 177.38% वाढला आहे. डिग्झॅमचा स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या वर ट्रेडिंग करत आहे.

काय आहे कंपनीचा व्यवसाय अन् आर्थिक स्थिती :-

ही भारतातील एक अग्रगण्य कापड कंपनी आहे, तिच्या स्वत:च्या ब्रँड अंतर्गत सूटिंगसाठी आणि परिधान करण्यास तयार कपडे तयार करणारी आहे. कंपनीला गुणवत्ता व्यवस्थापनासाठी ISO 9001 प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कंपनीकडे 1050 कर्मचारी कार्यरत आहे.