Take a fresh look at your lifestyle.

Share Market : 1.63 रुपयांच्या ‘या’ शेयर्सचा मोठा धमाका ; 1 लाखांचे झाले 3.37 कोटी ; तुमच्याकडं आहे का ?

शेतीशिवार टीम, 31 डिसेंबर 2021 : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचा संयमचं त्यांना कधी ना कधी करोडपती नक्कीच बनवतो. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अवंती फीड्सचे शेअर्स (Avanti Feeds Ltd).

हैदराबादमध्ये असलेल्या या कंपनीच्या शेअरची किंमत 8 जानेवारी 2010 NSE वर ₹1.63 वरून ती आज ₹ 563.00 वर बंद झाली आहे. जवळपास 12 वर्षांत या शेयर्समध्ये 33,650 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये (Multibagger penny stock) 12 वर्षांपूर्वी ₹ 1.63 प्रति शेअरच्या पातळीवर खरेदी करून ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 3.37 कोटी झाले असते. आज सकाळी हा शेअर ₹ 563.00 रुपयांवर ट्रेंड करत होता.

(Avanti Feeds Ltd) शेयर्सचा इतिहास जाणून घेऊयात….

हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका महिन्यात सुमारे ₹525 ते ₹563 पर्यंत वाढला आहे, या कालावधीत यामध्ये सुमारे 7.62% वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचं झालं तर, अवंती फीड्सच्या (Avanti Feeds) शेअरची किंमत ₹ 545.85 वरून ₹ 563.00 पर्यंत वाढली आहे, जी या कालावधीत 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु, गेल्या 5 वर्षांत, या मल्टीबॅगर शेअरची किंमत सुमारे ₹175 वरून ₹550 वर गेली आहे, या कालावधीत सुमारे 210% वाढ झाली आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या 10 वर्षांत, अवंती फीड्सच्या (Avanti Feeds) शेअरची किंमत ₹8.18 वरून ₹5550.05 पर्यंत वाढली आहे, या कालावधीत सुमारे 6600% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 12 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक ₹1.63 ते ₹550 प्रति शेअर स्तरावर गेला आहे, त्याच कालावधीत जवळपास 337 पट वाढ झाली आहे.

1 लाखांचे वर्षभरात झाले 56.50 लाख :-

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉक अवंती फीड्समध्ये (Avanti Feeds) ₹1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹1 लाख आज ₹1.05 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे ₹ 1 लाख आज ₹ 56.50 लाख झाले असते.