Take a fresh look at your lifestyle.

Share Market : TATA ने केलं मालामाल…फक्त 3 रु. हा शेयर गेला 187 वर ; 1 लाखांचे झाले 65 लाख, तुमच्याकडं आहे का ?

शेतीशिवार टीम, 29 डिसेंबर 2021 : गेल्या चार दिवसांपासून टाटा ग्रुप कंपनीच्या टीटीएमएलच्या (TTML) शेअरने उड्डाण घेतलं आहे. याआधी 5 सत्रांमध्ये, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना धक्का दिला होता आणि आता सलग चार दिवस ते अपर सर्किटमध्ये आहे. जर आपण गेल्या एका महिन्याबद्दल बोललो तर आतापर्यंत तो 74.64 टक्क्यांनी वाढला आहे, म्हणजे 80 रुपये प्रति शेयर वाढून 187.20 रुपयांवर पोहचला आहे.

Tata Teleservices (Maharashtra) Limited चे शेअर्स शुक्रवार, सोमवार, मंगळवार आणि आता बुधवारी देखील अपर सर्किटमध्ये आहेत. आज हा शेअर अपर सर्किटसह 8.90 रुपये प्रति शेअर चढून 187.20 रुपयांवर पोहोचला आहे.

एका वर्षात 1 लाखांचे झाले 65 लाख :-

गेल्या 6 महिन्यांत टाटा टेलिसर्व्हिसेसचा (Tata Teleservices) स्टॉक 40.50 रुपयांवरून 178.30 रुपयांपर्यंत वाढला आहे. यावेळी त्यात 340% वाढ झाली आहे. तर गेल्या 1 वर्षात, हा मल्टीबॅगर स्टॉक 7.85 रुपयांवरून 178.30 रुपयांपर्यंत वाढला आहे. यादरम्यान त्यात 2200% टक्क्यांनी वाढ झाली आहे.

16 ऑक्टोबर 2020 च्या या शेयर्सच्या किमतीच्या क्लोजिंगवर नजर टाकली, तर हा पेनी स्टॉक रु 2.75 वरून रु. 178.30 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत या स्टॉकमध्ये सुमारे 6400% वाढ झाली आहे.

सलग 5 दिवस लोअर सर्किट :-

याआधी नफेखोरीमुळे सलग 5 दिवस लोअर सर्किट सुरू होतं. या दरम्यान, बीएसईवर (BSE) टीटीएमएलचा (TTML) स्टॉक 32.90 टक्क्यांनी घसरल्यानंतर 154.10 रुपयांवर आला होता. गेल्या 52 आठवड्यांबद्दल बोलायचं झालं तर, 20 डिसेंबर 2021 रोजी तो 189.10 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.

30 डिसेंबर 2020 पर्यंत, हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना कमी रिटर्न्स देत राहिला आणि एका वर्षात 2370 % नी वाढून 7.90 रुपयांवरून 189.10 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी म्हणजेच 30 डिसेंबर रोजी तो NSE वर 7.90 रुपयांवर बंद झाला होता.

TTML काय आहे बिझनेस :-

TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लीडर आहे. कंपनी व्हॉईस, डेटा सेवा पुरवते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. बाजारातील जाणकारांच्या मते, गेल्या महिन्यात कंपनीने कंपन्यांसाठी स्मार्ट इंटरनेट आधारित सेवा सुरू केली आहे. कंपन्यांना जलद इंटरनेट आणि ऑप्टिमाइझ्ड नियंत्रणासह क्लाउड आधारित सुरक्षा सेवा मिळत असल्याने याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.